फोटो सौजन्य - Christina Ozturk
मुंबई, 13 फेब्रुवारी : आपण आई (mother) व्हावं, असं प्रत्येक महिलेला एका टप्प्यावर वाटतं. आई होण्यासाठी प्रत्येक महिला उत्सुक असते. आपल्याकडे अष्टपुत्रांचा आशीर्वादही दिला जातो. आधीच्या काळात इतकी मुलं व्हायचीही पण आता ते शक्य नाही. एक किंवा फार फार तर दोन मुलंच बस्सं होतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल रशियातील एक महिला वयाच्या तेविसाव्या वर्षातच तब्बल 11 मुलांची आई आहे आणि हे कमी की काय तिला 100 मुलांची आई व्हायचं (woman wants 100 child) आहे. 23 वर्षांची क्रिस्टिना ओज्टर्क (Christina Ozturk) हीचं मुलांवर अफाट प्रेम. त्यामुळेच इतक्या मुलांना ती सांभाळते. 11 मुलांची आई होऊनही तिचं मन काही समाधानी नाही. तिला 100 मुलं हवी आहेत. आज तकच्या रिपोर्टनुसार या दाम्पत्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितलं होतं की त्यांना 105 मुलं हवी आहेत आणि त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती. क्रिस्टिना म्हणाली, मी आम्हाला किती मुलं हवीत हे स्पष्ट नाही सांगू शकत पण एक नक्की आम्ही 11 मुलांवर थांबणार नाही. आमचं शेवटचं मूल कितवं असेल याचा आम्ही निर्णय नाही घेऊ शकत. मला वाटतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्यानुसारच सर्वांचा विचार व्हावा. हे वाचा - OMG! सर्जरी केली तरी वाढतच राहते; चौपट लांब आहे या चिमुकल्याची जीभ दरम्यान आता तुम्ही विचार कराल इतकी मुलं क्रिस्टिनाचीच आहेत का? तर ही मुलं तिचीच आहेत पण तिनं जन्म दिलेला नाही तर त्यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. न्यूजफ्लॅश मीडियाशी बोलताना क्रिस्टिनानं सांगितलं, “मी सहा वर्षांपूर्वी एका मुलाली जन्म दिला. त्यानंतर यापैकी कोणत्या मुलाला मी स्वतः जन्म दिला नाही. आम्ही सरोगसीच्या माध्यमातून या मुलांना जन्म दिला आहे. ही सर्व मुलं आमच्याच जेनेटिक्सची आहेत. आम्हाला अशा अनेक मुलांना जन्म द्यायचा आहे” जॉर्जियातील बातुमी शहरात हे कुटुंब राहतं. या शहरात सरोगसी बेकायदेशीर नाही आणि महिलांचा प्रेग्नन्सीसाठी वापर करून घेण्यातही तिथं गैर मानलं जात नाही. पण सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याची मोठी किंमत द्यावी लागते. जवळपास 8 हजार युरो म्हणजे तब्बल 7 लाख द्यावे लागतात. याचा अर्थ 100 मुलं हव्या असणाऱ्या क्रिस्टिनाला तब्बल 70 कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. हे वाचा - ‘मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे’; पतीसाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी, पाहा VIDEO बातुमीतल्या ज्या क्लिनिकमध्ये आम्ही सरोगसीसाठी जातो तेच आम्हाला सरोगेट महिला निवडून देतात. आम्ही वैयक्तिकरित्या या सरोगेट महिलांच्या संपर्कात नसतो किंवा आमचा त्यांच्याशी थेट संपर्क नसतो. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी क्लिनिकचीच असते, असं क्रिस्टिनानं सांगितलं.