मनाला आनंदी करणारा पाऊस कुणाला आवडत नाही, पण पावसाळा आला की अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना या मोसमात आजार होण्याचा धोका जास्त असतो. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांच्यानुसार, या मोसमात वातावरणात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे पचनशक्ती मंदावते. ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा जास्त फटका लहान मुलांना बसतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि म्हणूनच त्यांची चिंता जास्त वाटते. पावसाळ्यात मुलांच्या तब्येतीची कशी काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया - आसपास****च्या साफ**-सफाईची काळजी घ्या** पावसाळ्यात आर्द्रतेमुळे मच्छर, जीवाणू वाढीस लागतात. घरात आणि आसपासच्या परिसरात पाणी साचल्याने त्यात हे मच्छर आणि जीवाणू वाढतात, म्हणून साफ सफाईची विशेष काळजी घ्यावी. घरात फिनाईलचा वापर करून फरशी पुसून घ्यावी. ओलसर चपला-बूट घरात ठेऊ नये. घरातील कुलर, झाडांच्या कुंड्या जिथे पाणी साचण्याचा संभव असतो, त्यांची सफाई जरूर करावी. जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात घ्यावे मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून त्यांना जीवनसत्त्व सी असलेला आहार देत राहावे. त्यामुळे ते हंगामी आजारांपासून दूर राहतात. ज्या मुलांना प्रत्येक हंगामात सर्दी-खोकल्याची समस्या असते, त्यांना तर नियमित जीवनसत्व सी मिळेल असे पाहावे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्यानुसार, जीवनसत्व सी करिता मोसंबी,संत्री, लिंबू, आवळा हे मुलांना खाऊ घालत राहावे. पावसाळ्यात मुलांना घरातीलच पदार्थ द्यावे.** पावसाळ्यात मुलांना आजारांपासून वाचवायचे असेल तर त्यांना घरात बनवलेले पदार्थच खायला द्यावे. बाहेरील जंक फूड त्यांना जरी आवडत असले तरी, ते त्यांच्यासाठी नुकसानदायक असते. बाहेरील साफसफाईची तितकीशी काळजी घेतली जात नाही, त्यामुळे मुले आजारी पडू शकतात. घरातही शिळे अन्न मुलांना देऊ नये त्यात जीवाणू निर्माण झालेले असतात. मुलांना सूती कपडे घाला.** पावसाळ्यात कधी ऊन तर कधी पाऊस असतो. म्हणून मुलांना सुती कपडे घालणे चांगले असते. संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. सुती कपडे घामावाटे निघणारे विषारी द्रव्य शोषून घेतात. डॉक्टरांशी बोलून घरी आवश्यक औषधी ठेवा पावसाळ्यात अनेकदा मुलांची तब्येत अचानक खराब होते, अशावेळी हंगामी आजारांपासून वाचण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक औषधी घरात असू द्या, तातडीच्या परिस्थिती मध्ये त्या उपयोगी येतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - नाक वाहणे न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.