JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...

या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...

तुम्हाला औषधाच्या दुकानातून हे औषध थेट घेता येत नाही. यासाठी डॉक्टरांच्या मान्यतेचीच गरज लागते.

जाहिरात

योग्य प्रमाणात वाइन प्यायली तर यामुळे कर्करोग होण्याचा धोकाही बहुतांशी कमी होतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने ‘रेनिटिडिन’ या औषधावर धोक्याचा इशारा दिला आहे. या औषधामुळे कर्करोग होऊ शकतो असं म्हटलं आहे. या औषधांमध्ये अशी काही रसायनं आढळून आली ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. कमी किंमतीत मिळणारं रेनिटिडिन हे एक खूप जूनं औषध आहे. या औषधाचा वापर अनेकदा अॅसिडिटी कमी करण्यासाठी केला जातो. अन्य देशातील ड्रग रेगुलेटरनेही हे औषध धोकादायक असल्याचं सांगत यावर बंदी आणली आहे. आरोग्य सेवा संचालनालयच्या अंतर्गत ड्रग्ज कंट्रोलर वी.जी. सोमानी यांनी सर्व राज्यांना रेनिटिडिन या औषधाबद्दल सावधतेचा इशारा दिला आहे आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी सर्व औषध निर्मात्यांना कारवाई करण्यास सांगितली आहे. रेनिटिडिन औषधाचा उपयोग देशातील अनेक रोगांच्या लक्षणावर उपचार म्हणून केला जातो आणि गोळ्या आमि इन्जेक्शन अशा वेगवेगळ्या प्रकारात हे औषध दिलं जातं. हे अनुसूची एच अंतर्गत लिहिलेले औषध आहे. याचाअर्थ तुम्हाला औषधाच्या दुकानातून हे औषध थेट घेता येत नाही. यासाठी डॉक्टरांच्या मान्यतेचीच गरज लागते. या औषधामध्ये कर्करोगाची रसायनं असल्याचं सर्वातआधी अमेरिकेतील एफडीएनेने सांगितलं. यासंदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भारतात या औषधाचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तातडीने याचं उत्पादन रोखण्याचे आदेश देण्यात आले. बॉयफ्रेंडने खाऊ घातली पाणीपुरी, नंतर झाले असे काही की…. पाहा हा Viral Video Diabetes Diet: हे नाश्ताचे प्रकार मधुमेहाच्या रुग्णांना आहेत वरदान लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आजच खाणं सोडा या भाज्या! दिवाळीत फक्त 5 हजार रुपयांमध्ये फिरा या भन्नाट ठिकाणी कमी पैशांत दिवाळीची खरेदी करायची असेल तर या 4 वेबसाइटवर नक्की जा!

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या