JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali 2022: दिवाळीत लाडू, चकल्या, करंज्या खाऊन तुमच्याही पोटाचा बँड वाजलाय का? मग 'हे' उपाय नक्की करा

Diwali 2022: दिवाळीत लाडू, चकल्या, करंज्या खाऊन तुमच्याही पोटाचा बँड वाजलाय का? मग 'हे' उपाय नक्की करा

दिवाळीत चकल्या करंज्या खाऊन पोट बिघडलंय असेल तर पुढील उपाय नक्की करून बघा. लगेच आराम मिळण्यास होईल मदत.

जाहिरात

दिवाळी फराळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑक्टोबर :  सध्या दिवाळीचा आनंद सगळीकडेच पाहायला मिळतोय. अनेकजण आप्तेष्टांसोबत उत्साहात सण साजरा करताना दिसतात. दिवाळी म्हटलं, की घरोघरी गोडधोड पदार्थ, मिठाई, फराळाची रेलचेल असते. घरी आणि नातेवाईकांकडे गेल्यावर फराळ, मिठाई कधी आवड तर कधी आग्रह म्हणून खाल्ली जाते. पर्यायाने, तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. मुख्यत्वे पोटाच्या तक्रारी वाढतात. पण या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी आम्ही तुम्हाला काही छोट्या आणि उपयुक्त टिप्स सांगणार आहोत. यामुळे नक्कीच तुमच्या पोटाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत. जाणून घेऊ या टिप्सबद्दल अधिक माहिती. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलंय. 1. हायड्रेटेड राहा दिवाळीच्या दिवसांत तोंडावर ताबा राहत नाही. आपण तळलेले पदार्थ, गोड पदार्थांचे अधिक सेवन करतो. कोल्ड्रिंक्स, कॉकटेल यामुळेही शरीर डिहायड्रेट होतं. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ब्लॉटिंग अर्थात पोट फुगतं. दिवसातून 3-4 लिटर पाणी प्यायल्यास या समस्येला आळा बसतो. 2. आहारात फळांचा समावेश करा काहींना सतत पाणी पिणं जमत नाही. अनेकांना तशी सवयही नसते. पण यावर रामबाण उपाय म्हणजे फलाहार. अननस, टरबूज, संत्री, द्राक्षं अशी फळं खाणं हिताच ठरतं. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. फलाहार केल्याने केवळ पोटफुगीच्या (ब्लॉटिंग) तक्रारीला अटकाव होत नाही, तर शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सही मिळतात. हेही वाचा - Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला 3. आतड्यांची निगा राखा आहारात कायम अशाच गोष्टींचा समावेश असावा, ज्याने तुमची पचनशक्ती आणि आतडी सक्षम राहतील. यासाठी आहारात दही, ताक, लस्सी किंवा मिसो सूप सारख्या प्रोबायोटिक्स पदार्थांचा समावेश करा. यामुळे पोट फुगणं आणि पोटाच्या इतर समस्या नियंत्रणात राहतील. 4. अल्कोहोलचे सेवन टाळा दिवाळी पार्टीत अल्कोहोल घेणं टाळा. आग्रहामुळे ताबा ठेवणं जमत नसल्यास मद्यपान कमी प्रमाणात करा. दारूतील डेरिव्हेटिव्जमुळे पोटफुगीची समस्या वाढते. तसंच जास्त मद्यपानाने ही समस्या गंभीर बनू शकते. 5. पुरेशी झोप घेणं गरजेचं सणासुदीच्या दिवसांत काहीजण केवळ 2-3 तासच झोपतात. अपुर्‍या झोपेमुळे पोटाच्या तक्रारी वाढतात. कारण, झोपायला उशीर झाल्यास आहाराचे प्रमाण असंतुलित होते. अवेळी खाण्याचे प्रमाण वाढते. यासाठीच उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. 6. कॅफिनच्या सेवनावर नियंत्रण ठेवा अतिकॉफी पिण्याचा झोपेवर परिणाम होतो. यासाठी सणाच्या दिवसात जागरण झाल्यास कॉफी पिणं टाळा. कॉफीतील कॅफिनमुळे झोप उडते. त्यामुळे अधिकाधिक खाण्याची इच्छा वाढते. यासाठी कॉफी घ्यावी, पण योग्य प्रमाणातच घ्यावी. तब्येतीच्या तक्रारी टाळण्यासाठी आहाराचे काही नियम हे पाळायलाच हवेत. उत्तम आणि निरोगी आयुष्याची हीच गुरूकिल्ली आहे. अनेकांना सहजसोप्या अशा घरगुती उपायांची अपुरी माहिती असते. परंतु, प्रत्येकाने डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार डाएट घेणं हिताच ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या