प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 19 जुलै : या पृथ्वीवरील प्रत्येक जीव जो जन्माला (Birth) येतो, त्याचा मृत्यू (Death) अटळ आहे. जन्मानंतर माणसाने चांगली कामं केली असतील तर स्वर्गात जातो आणि वाईट कर्म केली असतील तर नरकात जातो, अशी धारणा आहे. माणसाचा जन्म आणि मृत्यू याच्याशी संबंधित गोष्टी या कायम कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. मृत्यू आणि त्याचे रहस्य जाणून घेण्यात लोकांना नेहमीच फार रस असतो. यासंदर्भात ‘लाईव्ह हिंदुस्थान’ने वृत्त दिलंय. मृत्यूनंतर माणसाच्या आत्म्याचं काय होतं, त्याचा आत्मा कुठे जातो, खरोखर पुनर्जन्म (Rebirth) नावाचा प्रकार आहे का, स्वर्ग किंवा नरक यासारखी ठिकाणं आहेत का, असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात आणि ते अनुत्तरीत राहतात. कारण या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत सापडलेली नाहीत. प्रत्येकजण आपल्या श्रद्धा (Belief) आणि धर्माच्या (Religion) आधारावर या गोष्टींवर विश्वास ठेवतो. विज्ञान (Science) मृत्यूला जीवनाचा अंत मानते, तर अनेक धर्मांच्या अभ्यासकांच्या मते आत्मा शरीर बदलत राहतो. अध्यात्मशास्राचे अभ्यासक त्यांच्या विश्वासाची साक्ष म्हणून कधीकधी निअर डेथ एक्सपिरियन्सची (NDE) उदाहरणं देतात. मृत्यू झाल्यानंतर परतल्याचा दावा करणारा असाच एक अनुभव सध्या व्हायरल होत आहे. नियर-डेथ एक्सपिरियन्स रिसर्च फाउंडेशनने (Near-Death Experience Research Foundation) आपल्या वेबसाइटवर टोनी नावाच्या व्यक्तीची गोष्ट शेअर केलीय. यामध्ये टोनीने 1994 ची एक घटना कथन केलीय. ज्यात त्याने मृत्यूचं वर्णन अतिशय आनंददायी, शांत (Peace) आणि प्रेमाने (Love) भरलेला मृत्यू होता, असं केलं होतं. टोनीने वेबसाईटवर लिहिलंय की, “मला आतापर्यंत जे प्रेम मिळालं त्यापेक्षा हजार पटीने जास्त प्रेम तेव्हा मिळालं होतं. त्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य आहे. सगळं अगदी शांत होतं. मला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता, फक्त प्रेम आणि शांततेची भावना होती.” मुलं शाळेत जायला नकार देतायत? मुलांच्या मनातील भीतीची ‘ही’ असू शकतात कारणं टोनीने सांगितलं की, तेव्हा तो त्याच्या शरीरात नव्हता. तसंच त्याला परत यायचंय की नाही हेदेखील विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला कोणाचाच आवाज ऐकू आला नाही, फक्त ही गोष्ट त्याला जाणवली. त्यानंतर त्याने या जगात परतण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या शरीरात परतला. या वेबसाईटवर अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. असाच एक अनुभव एका नर्सने शेअर केलाय. कोरोना संसर्गानंतर हृदयविकाराचा झटका आलेल्या नर्सनेही तिचा अनुभव सांगितला. ती सांगते, “एक प्रकाश आला आणि मी त्यात वाहत गेले. त्यावेळी मला इतकं प्रेम वाटलं जे पृथ्वीवर कधीच अनुभवलं नव्हतं. एक लांब बोगदा होता आणि त्याच्या शेवटी कोणीतरी वाट पाहत होतं. मला घरी परतल्यासारखं वाटत होतं. तेव्हा मी माझं शरीर पोर्चमध्ये झोपलेलं पाहिलं आणि मला परत जायचं नव्हतं.” या वेबसाईटवर अनेकांनी त्यांचे अनुभव सांगितले, त्यातील सर्वांमध्ये एक साम्य होते, ते म्हणजे सर्वांनीच त्यावेळी खूप प्रेम अनुभवलं किंबहुना आपल्या जवळच्या लोकांसोबत असतानाही अनुभवलं नव्हतं, तेवढं प्रेम आणि शांतता तेव्हा अनुभवली.