JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशीप टिकेल का? 6 सेकंदात या Optical Illusion मधून मिळेल उत्तर!

तुमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशीप टिकेल का? 6 सेकंदात या Optical Illusion मधून मिळेल उत्तर!

ओलेग शुप्लियाक यांनी आज काढलेले ऑप्टिकल इल्युजन पेंटिंग तुम्हाला लाँग डिस्टन्स रिलेशनशीप यशस्वीरित्या टिकवून ठेवू शकते का हे उघड करू शकते. त्यासाठी तुम्ही पहिल्या 6 सेकंदात काय पाहिलं हे लक्षात ठेवा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : सध्या ऑप्टिकल इल्युजनच्या (Optical Illusion) फोटोंचा ट्रेंड सुरू आहे. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. अनेकदा लोक हे फोटो पाहून विचारात पडतात. ऑप्टिकल इल्युजनच्या एका फोटोत अनेक चेहरे किंवा कलाकृती दडलेल्या असतात. त्या पाहून आपला गोंधळ उडतो. आता असाच एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोने नेटकऱ्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. असं म्हणतात की, ऑप्टिकल इल्युजन्सच्या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतं यावरून तुमची गुपितं, आयुष्यातील रहस्यं उलगडता येतात; पण त्यासाठी या फोटोंचा अर्थ लावता येणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोंचे अर्थ कळतात. त्यांना तुम्हाला व्यक्तिशः भेटण्याची किंवा तुमच्याशी बोलण्याचीदेखील आवश्यकता नसते. तरीही ते तुमची गुपितं उघड करू शकतात आणि तुमचं खरं व्यक्तिमत्व लोकांना सांगू शकतात. त्यासाठी तुम्हाला त्या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोत सर्वांत आधी काय दिसलं, एवढी माहिती त्यांना पुरेशी असते. आज आपण ज्या फोटोबद्दल बोलणार आहोत, तो फोटो ऑप्टिकल इल्युजन पेंटिंगसाठी (Painting) प्रसिद्ध असलेल्या युक्रेनियन कलाकार ओलेग शुप्लियाकचं पेंटिंग आहे. या संदर्भात जागरण जोश डॉट कॉमने वृत्त दिलंय. आता हा फोटो पाहा आणि पहिल्या 6 सेकंदांत तुम्हाला काय दिसतं ते आम्हाला सांगा. पहिल्या सहा सेकंदांत तुम्हाला काय दिसलं यावरून तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दलचं (Long Distance Relationship) मत कळेल. व्हेनिस हे ठिकाण हे रोमँटिक संध्याकाळ आणि वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. याच व्हेनिसमधील थंड आणि शांत संध्याकाळची कल्पना करून ओलेगने हे पेंटिंग तयार केलं आहे. आता आपण याच्या ऑप्टिकल इल्युजनच्या अर्थाकडे येऊ. तर, पहिल्या 6 सेकंदांत अनेक लोकांनी पूल आणि बोट, इमारतीच्या आत जाणारं जोडपं किंवा चेहरा (बुद्ध किंवा मुखवटा घातलेला कोणीतरी) दिसल्याचा दावा केला आहे. आता तुम्हाला काय दिसलं ते सांगा. तुम्हाला सर्वांत आधी काय दिसलं ते आणि त्याचे अर्थ जाणून घ्या. पूल आणि बोट: ज्यांनी या फोटोत सर्वात आधी पूल आणि त्याखालील बोट (Boat) पाहिली त्या लोकांचं मन स्वच्छ आहे. त्यांना नेमके काय हवं आहे हे त्यांना ठाऊक आहे. ते कोणत्याही अपेक्षेशिवाय नाती जोडतात. तसंच लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणं, त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. ते समाधानी असेपर्यंत निःसंशयपणे नाती निभावतात. Chanakya Niti: अशा लोकांसोबत कधीही वाद घालू नये; चाणक्य नीतीमध्ये सांगितलेय त्याचे कारण.. ब्रिजमधील चेहरा: ज्यांना सुरुवातीला या फोटोत पुलामध्ये चेहरा (Face) दिसतोय ते आयुष्यात आनंदी राहणारे असतात. त्यांना कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ करायला आवडत नाही आणि त्यांच्यातही हस्तक्षेप करायला आवडत नाही. म्हणून, जोपर्यंत त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही तोपर्यंत ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवून ठेवू शकतात; पण नंतर त्यांच्या जीवनावर परिणाम होऊ लागल्यास ते स्वतःच्या शांतीसाठी त्या नात्यातून बाहेर पडतात. ovez इमारतीच्या आत जाणारं कपल : जर तुम्ही या फोटोत सर्वांत आधी एका जोडप्याला (Couple) इमारतीच्या आत जाताना पाहिलं असेल तर तुम्ही खूप फोकस्ड व्यक्ती आहात आणि तुम्हाला वर्तमानात जगायला आवडतं, असा त्याचा अर्थ होतो. तसंच भविष्यात निश्चितपणे प्रत्यक्षात घडू शकणार नाहीत, अशा गोष्टींसाठी प्रयत्न करण्याकडे तुम्ही फारसं लक्ष देत नाही. तसंच तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहण्यास इच्छुक असणारी व्यक्ती नाही. तुम्ही एका चांगल्या टप्प्यावर नातं संपवून आयुष्यात पुढे जाणारे आहात, असा याचा अर्थ होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या