JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अवघ्या एक वर्षाचा Baby Chef शिकवतोय रेसिपी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल So sweet

अवघ्या एक वर्षाचा Baby Chef शिकवतोय रेसिपी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल So sweet

शेफ कोबी (kobe) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 13 मे : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरात आपला छंद जोपासत आहेत. बहुतेक लोकं तर नवनवीन रेसिपी (recipe) बनवत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अशा रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. त्यात एका बेबी शेफनं (baby chef) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अवघ्या एक वर्षाचा हा बेबी शेफ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एक वर्षांचा बेबी शेफ कोबे (kobe), अमेरिकेतील व्हर्जिनियात राहतो. इतर सर्व लोकांप्रमाणे कोबेदेखील वेगवेगळ्या रेसिपी बनवतो आहे आणि सोशल मीडियावर इतरांनाही धडे देतो आहे.

चेहऱ्यावर हास्य, मध्ये मध्ये बोबडे इन्स्ट्रक्शन आणि रेसिपी बनवता बनवता काही पदार्थ तोंडात घालणं, शेफ कोबेचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल.

जाहिरात

शेफ कोबेचं फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट आणि युट्युब चॅनलही आहे. कोबे इट्स (Kobe Eats) असं त्याचं नाव. फूड डॉट एनडीटीव्हीनुसार कोबेचे पालक त्याचं सोशल मीडिया हँडल करतात. त्याच्या युट्युब चॅनेलचे 2 लाखांपेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत.त्याच्या प्रत्येक व्हिडिओला हजारो लाइक्स असतात.

जाहिरात

सध्या टीव्ही, सोशल मीडिया सर्वत्र कोरोनाव्हायरसच्याच बातम्या पसरत आहेत, चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मकता निर्माण होणं खूप गरजेचं आहे. शेफ कोबेचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी सकारात्मकता आणि एक नवी ऊर्जा तर नक्कीच मिळते. चला तर मग आता कसली वाट बघताय, याच सकारात्मक ऊर्जेसह शेफ कोबेनं शिकवलेल्या रेसिपी बनवायला घ्या. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा Lockdown मध्ये कपालभाती करणारी ही खार झाली स्टार, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या