JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शास्त्रज्ञांना सापडल्या तब्बल 13000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा; दडलाय मायलेकाचा इतिहास

शास्त्रज्ञांना सापडल्या तब्बल 13000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा; दडलाय मायलेकाचा इतिहास

व्हॉइड सँड्स नॅशनल पार्क येथे प्लेआ या कोरड्या पडलेल्या तलावात या पाऊलखुणा (footstep) आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 18 ऑक्टोबर : अमेरिकेतील न्यू मॅक्सिकोत वैज्ञानिकांना हजारो पाऊलखुणा (footsteps) सापडल्या आहेत. त्या तब्बल साडे अकरा हजार ते तेरा हजार वर्षांपूर्वीच्या असू शकतात, असा एक अंदाज बांधला जात आहे. व्हॉइड सँड्स नॅशनल पार्क येथे प्लेआ या कोरड्या पडलेल्या  तलावात या पाऊलखुणा आहेत.  ज्या एका बालकाच्या आणि त्याच्या आई असाव्यात असं शास्रज्ञांना वाटतं आहे. या पाऊलखुणांचा शास्त्रज्ञांनी नीट अभ्यास केला. पाऊलखुणा असलेलं मूल दर सेंकदाला 1.7 मीटर वेगानं चालत असावं. या कोरड्या पृष्ठभागावर त्या बाळाच्या निवांत चालण्याची गती दरसेकंदाला 1.2 ते 1.5 मीटर असावी असं दिसतं आहे.  सुमारे 1.5 किलोमीटर लांब असलेल्या या ट्रॅकवर हिमयुगातील जीवाश्माच्या या पाऊलखुणा राहिल्या असतील. त्यावरून असं वाटतं आहे की जेवढ्या लवकर आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाता येईल तितकं जाण्याचासाठी त्या बाळाने आणि त्याच्या आईने प्रयत्न केला असावा. विशेष बाब म्हणजे या ट्रॅकच्या मध्यभागी मुलाच्या पायाचे ठसे दिसू शकतात. कदाचित आईने मुलाला कडेवर घेतलं असताना ती बदलण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी त्या आईने मुलाला जमिनीवर ठेवलं असावं. हे वाचा -  देवमाशाची कृपा! Whale ने केली उलटी आणि तो झाला करोडपती खराब हवामान किंवा अन्य काही अडथळे हे त्या आईच्या घाईचं कारण असू शकतं. पण त्या काळात त्या परिसरात असलेल्या मेगा फॉनाच्या भीतीमुळेही त्या आईला घाईने तिच्या इच्छित स्थळी पोहोचायचं असेल असा शास्रज्ञांचा तर्क आहे. या प्रदेशात त्या काळात मॅमॉथ हा हिंस्त्र प्राणी, लांडगे, उंट यांसारख्या प्राण्यांचं वास्तव होतं. या प्राण्यांची माणसांनी शिकारही केली असेल. पण अशा एखाद्या प्राण्यापासून बचाव करण्यासाठी ही आई आपल्या मुलाला कडेवर घेऊन घाईघाईने निघाली असेल असं शास्रज्ञांचं मत आहे. हे वाचा -  कसं शक्य आहे? सहारा वाळवंटात आढळली 1.8 अब्ज झाडं, सॅटेलाइट PHOTO आले समोर या ट्रॅकचे दोन सेट आहेत. त्यात परतण्याच्या पाऊलखुणांमध्ये केवळ आईच्या पायांच्या खुणा दिसत आहेत. याचा अर्थ त्या मुलाला ही आई कुठेतरी सोडून परतली असावी असाही लावता येऊ शकतो. अनेक ठिकाणी असे जीवाश्मांचे अवशेष सापडतात. पाऊलखुणा सापडतात. त्याचा अभ्यास करून शास्रज्ञ मानव प्रजातीचा आणि विविध प्राण्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या