पंचेद्रियांपैकी डोळे अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे. त्याने माणूस जीवन अनुभवतो. वाढते वय आणि डोळ्यांवर येणारा ताण यामुळे डोळ्यावर परिणाम होतो. व्यक्तीच्या जीवनशैलीशी याचा खूप जवळचा संबंध आहे. चांगल्या जीवनशैलीने डोळ्यांच्या समस्या कमी करता येऊ शकतात. काही पोषक तत्व हे डोळ्यांसाठी आवश्यक असतात. ते हानीकारक प्रकाश किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करतात, आणि वयानुसार होणाऱ्या आजारांना दूर ठेवतात. इथे अशा 5 पोषक घटकांची माहिती दिली आहे जे डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात. जीवनसत्व ई : myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांचे म्हणणे आहे कि जीवनसत्व ई च्या अभावाने अंधुक दिसणे, आंधळेपणा, मोतीबिंदू होऊ शकते. म्हणून आहारात जीवनसत्व ई असलेले पदार्थ खाणे चांगले. बदाम, अक्रोड, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया अळशीचे तेल, पालक, ब्रोकोली, ऑलिव्ह तेल या सर्वांमध्ये जीवनसत्व ई असते. जीवनसत्व सी : जीवनसत्व सी एक चांगले अँटीऑक्सिडंट आहे, त्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पुरेशा प्रमाणात जीवनसत्व जर आहारात असेल तर मोतीबिंदू होण्यापासून वाचता येऊ शकते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, मिरे, हिरव्या पालेभाज्या, आंबट फळे, आणि पेरू यांचा समावेश होतो. ओमेगा**-3 फॅटी अॅसिड :** myupchar.com चे डॉ. आयुष पांडे यांचे म्हणणे आहे की ओमेगा-3 फॅटी अॅसिड जर योग्य प्रमाणात असेल तर प्रौढांना स्नायूंची हानी आणि डोळे कोरडे होणे यापासून सुटका मिळते. डोळ्यांच्या स्नायूंची हानी ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे अंधुक दिसू लागते. तर डोळ्यात योग्य प्रमाणात अश्रू निर्माण न झाल्याने डोळे कोरडे होतात त्यामुळे डोळ्याचा ओलावा कमी होऊन चिकटपणा कमी होतो. मासे, टूना मासे, शेंगदाणे, अळशीचे तेल , कॅनोला तेल यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. जीवनसत्व ए : जीवनसत्व ए हे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे, जे काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळून येते. तसेच ते काहीवेळा प्रोव्हिटॅमिनमधूनही मिळते. जीवनसत्व ए ला रेटिनोलसुद्धा म्हणतात, कारण ते डोळ्यांचा पडदा बनवणाऱ्या रंगद्रव्यांच्या निर्मितीसाठी फायदेशीर असते. आंधळेपणाचे सगळ्यात सामान्य कारण जीवनसत्व ए चा अभाव आहे. गाजर, बीट, रताळे, मटार, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, राजमा, अंडे, बिन्स यामध्ये जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात असते. जस्ता : जस्ता हे डोळ्यात असणारे महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. हे मेलानिनच्या निर्मितीत मदत करते जे डोळ्यांच्या रंगद्रव्यांपैकी एक आहे. जस्ताची कमतरता रातांधळेपणाला कारणीभूत ठरू शकते. रेड मीट आणि कोंबडी हे त्याचे उत्तम स्त्रोत आहेत. तसेच ते नैसर्गिकरित्या शेंगदाणे , लसूण , तीळ , राजमा, डाळी सोयाबीन, अळशी, बदाम, गहू, अंड्यातील बलक यात आढळून येते. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - फळांचे फायदे न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.