JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mushroom In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये मशरूम खाणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Mushroom In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये मशरूम खाणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

हल्ली मशरूम सहज उपलब्धही असतात आणि लोक तितक्याच सहजतेने ते खातातही. मात्र गरोदरपणात मशरूम खावे का? ते बाळासाठी सुरक्षित असतात का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणंही महत्वाचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 नोव्हेंबर : गर्भधारणेचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा टप्पा आहे, परंतु यादरम्यान स्त्रीला अनेक मानसिक आणि शारीरिक त्रासातुनही जावं लागतं. गर्भधारणे दरम्यान निरोगी आणि संतुलित आहार राखणे खूप महत्वाचे आहे. कारण ते आई आणि बाळ दोघांनाही निरोगी राहण्यास मदत करते. या काळात कोणते पदार्थ खावे, यासोबतच कोणते पदार्थ खाऊ नये हेदेखील महत्वाचे असते. हल्ली मशरूम खाणं खूप स झालं आहे. म्हणजे मशरूम सहज उपलब्धही असतात आणि लोक तितक्याच सहजतेने ते खातातही. मात्र गरोदरपणात मशरूम खावे का? ते बाळासाठी सुरक्षित असतात का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणंही महत्वाचं आहे. आज आपण याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. हरजिंदगीशी संवाद साधताना डॉक्टर रितू पुरी यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Pregnancy Tips : गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर

मशरूम खावे की नाही? डॉक्टर पुरी यांच्यामते गरोदरपणात मशरूमचे सेवन करणे चांगले मानले जाते. कारण यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी असतात, ज्याचा फायदा गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही होतो. मशरूममध्ये असलेले व्हिटॅमिन डी गर्भधारणेदरम्यान महिलेसाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. यामुळे महिलांची हाडे मजबूत होतात.

मशरूम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासदेखील उपयुक्त आहे. तसेच यामध्ये असलेले लोह गर्भधारणेदरम्यान स्त्रीला हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. यामध्ये असलेले झिंक, पोटॅशियम आणि सेलेनियम यांचाही बाळाच्या विकासावर सकारात्मक परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान मशरूम खाल्ले जाऊ शकते. मात्र महिलांनी हे खाताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

Pregnancy Tips in Marathi : गरोदरपणात जबरदस्त औषध आहे हा ज्युस; प्रेग्न्सीतील सर्व समस्या होतील दूर

संबंधित बातम्या

बाजारात अनेक प्रकारचे मशरूम मिळतात, परंतु गरोदरपणात महिलांनी पॅरासोल मशरूम आणि फॉल्स मोरेल्स मशरूमचे सेवन टाळावे. तसेच मशरूम व्यवस्थित धुवून आणि शिजवून खावे. ते कधीही कच्चे आणि जास्त प्रमाणात खाऊ नये. नेहमी ताजे मशरूम खरेदी करा आणि गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते खा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या