JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Parenting Tips : मुलांना मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले पदार्थ देताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

Parenting Tips : मुलांना मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले पदार्थ देताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

अन्न शिजवण्यासाठी आणि गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह अतिशय उपयुक्त तत्रज्ञान आहे. परंतु त्यात अन्न शिजवल्याने किंवा गरम केल्याने अन्नातील पोषक घटक नष्ट होतात असे अनेकांचे मत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर : बहुतेक घरांमध्ये मायक्रोवेव्ह असते. अन्न शिजवण्यासाठी आणि गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह अतिशय उपयुक्त तत्रज्ञान आहे. परंतु त्यात अन्न शिजवल्याने किंवा गरम केल्याने अन्नातील पोषक घटक नष्ट होतात असे अनेकांचे मत आहे. परंतु हे पूर्णपणे खरे नाही. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये उरलेले अन्न शिजवू शकता आणि गरम करू शकता. हे अन्न तुम्ही स्वत: खात असाल तर ते ठिक आहे. परंतु मुलांना हे अन्न देताना पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्याही घरात बाळ असेल आणि तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये बाळाचे अन्न पुन्हापुन्हा गरम कर असाल तर ते तुमच्या मुलांसाठी घातक ठरू शकते. मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवणे किती सुरक्षित आहे हे आज आपण येथे जाणून घेणार आहोत. मायक्रोवेव्हमध्ये कच्चे अन्न शिजवल्यानंतर किंवा गरम केल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक बदलतात. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील पोषक घटक खराब होतात असा अनेकांचा समज आहे. परंतु हे सिद्ध करणारा कोणताही रिसर्च अद्याप समोर आलेला नाही. तसेच मायक्रोवेव्हमध्ये बाळाचे अन्न गरम केल्याने तुमच्या बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते असेही कोणतेही संशोधन नाही. परंतु मायक्रोवेव्हमध्ये बाळाचे अन्न गरम करताना ते नेहमी झाकून ठेवा आणि गरम करण्यासाठी प्लॅस्टिकची भांडी वापरू नका. कारण प्लास्टिकमुळे अन्नामध्ये हानिकारक रसायने मिसळू शकतात.

व्यायामानेच कंट्रोलमध्ये राहिल डायबेटिस; मधुमेही रुग्णांसाठी जबरदस्त एक्सरसाइझ

संबंधित बातम्या

ही काळजी घ्या - आरोग्य तज्ज्ञांच्या मते घरात बनवलेले अन्न मायक्रोवेव्हमध्ये ठेवता येऊ शकते. तसेच मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकऐवजी स्टीलची भांडी वापरावीत कारण प्लास्टिकमुळे मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. - मायक्रोवेव्ह असामान्यपणे गरम करण्याचे काम करते. त्यामुळे अन्नाचा काही भाग चांगला गरम होतो, तर काही भाग जास्त गरम होतो. त्यामुळे बाळाचे तोंड जळू शकते. - स्वस्त प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये बाळाचे अन्न शिजवणे किंवा गरम करणे बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवताना किंवा गरम करताना बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. - बाळाचे अन्न शिजवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्ह सेफ कंटेनर किंवा उष्णाता रोधक काचेच्या कंटेनरचा वापर करू शकता. Brain And Heart : हृदय कमकुवत असणाऱ्यांचा मेंदू लवकर होतो वृद्ध! असं आहे हार्ट आणि ब्रेनचं कनेक्शन - मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना ते नेहमी झाकून ठेवा. यामुळे अन्नातील ओलावा संपणार नाही. अन्न योग्य प्रकारे शिजवल्याने किंवा गरम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होतील आणि बाळाला अन्नातून विषबाधा होणार नाही. - बाळाचे अन्न मायक्रोवेव्हमधून बाहेर काढल्यानंतर एका वेगळ्या भांड्यात घ्या आणि ते चांगले मिक्स करा, जेणेकरून त्याचा कोणताही भाग जास्त गरम किंवा थंड राहणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या