JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Makeup Mistakes : मेकअप करताना होणाऱ्या या 4 चुकांमुळे आपण जास्त एजड् दिसतो

Makeup Mistakes : मेकअप करताना होणाऱ्या या 4 चुकांमुळे आपण जास्त एजड् दिसतो

Makeup Mistakes That Make You Look Older : तरुण-तरुणी मेकअपसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. पण, मेकअप चुकीच्या (Mistakes) पद्धतीने करत असाल तर कदाचित यामुळे तुमची त्वचा तुमच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर आणि एजड् दिसायला लागू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मार्च : मेकअप (Makeup) केल्यानं आपण सुंदर आणि आकर्षक तर दिसतोच आणि त्यातून आपली क्रिएटिविटी दिसून येते. मेकअप केल्यानं आपल्या स्वतःला आनंदी आणि फ्रेश वाटतं, उत्साह वाढतो. विशेषत: तरुण-तरुणी मेकअपसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. पण, मेकअप चुकीच्या (Mistakes) पद्धतीने करत असाल तर कदाचित यामुळे तुमची त्वचा तुमच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर आणि एजड् दिसायला लागू शकते. जाणून घेऊया मेकअप करताना आपल्याकडून होणाऱ्या चुका कशा टाळायला (Makeup Mistakes That Make You Look Older) हव्यात. कोरडी त्वचा तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्ही कोरड्या त्वचेवर मेकअप करत असाल तर मेकअपला त्वचा लवकर शोषून घेईल आणि तुमच्या त्वचेवर सुरकुत्या तयार होऊ लागतील. यासाठी त्वचेला अगोदर चांगले पोषण देणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास फक्त रात्रीच्या वेळी कोरड्यासाठी उपयुक्त क्रीम वापरा. फाउंडेशनचा जास्त वापर जास्त फाउंडेशनचा वापर करणं चुकीचं आहे, यामुळे आपलं वय जास्त वाटू शकतं. चेहऱ्यावर आपण जास्त फाउंडेशन लावले तर त्यामुळे त्वचा चकचकीत दिसते आणि काही वेळातच चेहऱ्यावर बारीक रेषा तयार होऊ लागतात. फाउंडेशनला चांगल्या पद्धतीनं ब्‍लेंड करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. लिपस्टिकची चुकीची शेड लिपस्टिकच्या काही शेड्स महिलांच्या त्वचेला मॅच होत नाहीत आणि त्या लावल्यानं आपण अधिक प्रौढ दिसू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही पिवळ्या, लाल आणि जांभळ्या शेडची लिपस्टिक लावत असाल ज्यामध्ये निळा यो पर्पल टिंट नसेल, तर या शेड्समुळे तुम्ही जास्त वयस्क दिसू शकता. हे वाचा -  पिंपल्स घालवण्यासाठी हे 3 स्पेशल हर्बल ड्रिंक्स घेऊन पाहा; लगेच दिसेल परिणाम डोळ्यांभोवतीच्या रंगांची निवड लिपस्टिकप्रमाणेच डोळ्यांच्या भोवतीच्या चुकीच्या मेकअपमुळे आपण अधिक वृद्ध दिसाय लागू शकतो. आय शॅडो करताना चुकीच्या शेड्स वापरणं टाळा. कधीकधी स्मोकी आय मेकअपमुळंही एजड् दिसू लागतं. जर तुम्ही डोळ्यांभोवती गडद आणि डार्क रंगाच्या आयशॅडो वापरत असाल तर त्यामुळेही आपण अधिक वयस्कर दिसू शकता. डोळ्याभोवतीच्या मेकअपमध्ये फक्त नैसर्गिक शेड्स वापरल्यास उत्तम होईल. हे वाचा -  कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या