JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनापासून कित्येकांना वाचवलं स्वत: मात्र लढाई हरला; 26 वर्षांच्या corona warrior डॉक्टरनं जीव गमावला

कोरोनापासून कित्येकांना वाचवलं स्वत: मात्र लढाई हरला; 26 वर्षांच्या corona warrior डॉक्टरनं जीव गमावला

कोरोना रुग्णांना वाचवणारा कोरोना योद्धा (corona warriors) डॉक्टर स्वत: मात्र कोरोनाविरोधातील लढाई हरला आहे. कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 25 नोव्हेंबर : कोरोना रुग्णांना (corona patient) कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी धडपडणारा अवघ्या 26 वर्षांचा कोरोना योद्धा (corona warrior) स्वतः कोरोनाच्या कचाट्यात सापडला. रुग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालून लढा देणारा कोरोना वॉरिअर्स स्वतः मात्र कोरोनाविरोधातील लढाई हरला आहे. कोरोनामुळे मध्य प्रदेशातील (madhya pradesh) डॉ. शुभम उपाध्याय (dr. subham upadhyay) यांचा मृत्यू झाला आहे. शुभम उपाध्याय कोरोना रुग्णांच्या सेवेत होते. कोरोना रुग्णांवर उपचार करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. 28 ऑक्टोबरला ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. भोपाळच्या चिरायू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. हळूहळू त्याची प्रकृती इतकी बिघडली की ते कोरोनाशी दोनहात करण्याइतपत सक्षम राहिले नाहीत. रुग्णांसाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढणारे डॉ. उपाध्याय स्वतःच्या आयुष्यासाठी मात्र कोरोनाशी लढू शकले नाहीत. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यातील एक कोरोना योद्धा गमावल्यानं  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनीदेखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केलं की, “मनाला खूप वेदना होत आहेत, खूप दुःख होत आहे. आमचा निर्भीड कोरोना योद्धा डॉ. शुभम कुमार उपाध्याय जे निःस्वार्थ वृत्तीनं दिवसरात्र एक करून कोव्हिड 90 ग्रस्तांची सेवा करताना संक्रमित झाले. त्यांनी आज आपले प्राण गमावले आहेत.

संबंधित बातम्या

“डॉक्टर बनताना जी शपथ दिली जाते, त्याचा शब्द न शब्द डॉ. शुभम यांनी सार्थकी लावला. देशाचा एक खरा नागरिक असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. भारतमातेच्या असा सुपुत्राला मी श्रद्धांजली अर्पित करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो”, अशी प्रार्थना शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.

जाहिरात

“मला आणि संपूर्ण मध्य प्रदेशला डॉ. शुभम यांचा अभिमान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांना इतका मोठा धक्का सहन करण्याची ताकद देवो. मी आणि मध्य प्रदेश सरकार ़डॉ. उपाध्याय यांच्या कुटुंबासोबत आहोत”, असं मुख्यमंत्री चौहान म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या