JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रदूषणामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता होतेय कमी; ‘हा’ काढा देईल आराम

प्रदूषणामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता होतेय कमी; ‘हा’ काढा देईल आराम

सध्या राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर वायू प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. प्रदूषणातील वाढीमुळे शाळाही बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिलेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 नोव्हेंबर :  दिवसेंदिवस वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. वायू प्रदूषणामुळे असाध्य आणि दुर्धर विकारांचा सामना करावा लागतोय. सर्दी, ताप, खोकला यासारखे विकार हल्ली कुठल्याही ऋतुत होतात. याचं कारण एकंदर प्रदूषणातच मोठी वाढ झालीय. सध्या राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर वायू प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. प्रदूषणातील वाढीमुळे शाळाही बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिलेत. सध्या दिल्ली शहराची अवस्था अतिशय घातक झाली आहे. प्रत्येक शहराचा एक एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) मोजला जातो. यामुळे आपल्याला शहरातील प्रदूषणाची स्थिती तसंच हवेतील विषारी, दूषित घटकांचं प्रमाण समजतं. यानुसार सध्या दिल्ली शहराचा AQI इंडेक्स हा 350 ते 400 च्या दरम्यान आहे. यामुळे दिल्ली शहराचं एकंदर आरोग्य धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या ही प्रदूषणवाढीस घातक ठरते आहे. हेही वाचा -  Fatty Liver Disease : …तर दारू न पिताही तुमचं लिव्हर होतं खराब; दिसतात अशी लक्षणं केवळ वायू प्रदूषणच नाही तर दूषित पाणी, ध्वनी प्रदूषण यामुळे आरोग्याच्या तक्रारी गंभीर होत आहेत. तसंच याचा परिणाम येणार्‍या पिढ्यांवरही होईल हे मात्र निश्चित. डोळे चुरचुरणं, डोळे लाल होणं, सतत नाक वाहणं, खोकला, ताप, काविळ यासारखे आजार प्रदूषणामुळेच उद्भवतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची पातळी खालावली की, तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. वायू प्रदुषणामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये खूप वाढ होतेय. याचं मुख्य कारण म्हणजे फुफ्फुसांची कार्यक्षमता क्षीण होणं. यासाठी काही घरगुती उपाय हे फुफ्फुसांची कार्यक्षमता सक्षम करण्यास मदत करू शकतात. जाणून घेऊयात याबद्दलची माहिती. आयुर्वेदात विविध औषधांची माहिती आढळते. तसंच प्रत्येक औषधी वनस्पतीचा गुणधर्मही दिला आहे. कफ, वात, पित्त अशा तीन प्रकारच्या प्रकृतींसाठी कोणती वनस्पती लागू होते याबद्दलही विशेष माहिती आहे. त्यानुसारच फुफ्फुसांचं कार्य सक्षम होण्यासाठी काही काढे किंवा रस शरीरासाठी मदतगार सिद्ध होतात. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. ओव्याच्या पानांचा काढा ओव्याचा काढा किंवा ओव्याचा अर्क हा फुफ्फुसांसाठी उपयुक्त ठरतो. ओव्यच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढ होते. यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ ओव्याच्या पानांच्या रसात गूळ आणि मीठ घालून काढा तयार करा आणि नियमित सेवन करा. कच्च्या हळदीचा काढा हळद ही अतिशय गुणकारी म्हटली जाते. कच्च्या हळदीच्या सेवनाने होणारे फायदे खूप आहेत. यात अँटिइन्फ्लेमेटरी घटकांचं प्रमाण विपुल आहे; जेणेकरून तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. परिणामी, तुम्ही कुठल्याही आजाराला दूर ठेवणं शक्य होतं. तसंच फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. शरीराला सूज येणं, अ‍ॅलर्जी यासारख्या गोष्टींवर कच्च्या हळदीचा काढा रामबाण उपाय ठरतो. गवती चहाचा काढा गवती चहाचा काढा घेतल्याने तुमचं शरीर डिटॉक्स होतं. अर्थात, निर्जुंतकीकरण होतं. गवती चहामध्ये असलेल्या अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणांमुळे शरीराची इम्युनिटी उत्तम राहते. गवती चहामुळे अ‍ॅलर्जीची समस्या दूर होते. तसंच कोरडा खोकला आणि अस्थमा पेशंटसाठी गवती चहाचा काढा गुणकारी आहे. ज्येष्ठमध आणि दालचिनीचा काढा पाव किलो दालचिनी, अर्धा किलो ज्येष्ठमध आणि पाव किलो गवती चहा याचे मिश्रण एकत्र कुटून पावडर तयार करा. आता या मिश्रणात वेलची, तुळस आणि गुळवेलाची पानं बारीक करून मिक्स करा. दररोज दोन कप पाण्यात ही काढ्याची पावडर घालून उकळा. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. हा काढा प्यायल्याने तुमची इम्युनिटी मजबूत होईल. तसंच हा काढा घेतल्याने छातीतील कफ कमी करून फुफ्फुसांचे आरोग्य चांगलं राहील. अनेकदा कितीतरी घरगुती उपायांची आपल्याला पुरेशी माहिती नसते. परंतु, हे आयुर्वेदिक उपचार अतिशय गुणकारी ठरतात आणि साईड इफेक्टसदेखील होत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या