JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Lunar Eclipse 2020: वर्षातलं तिसरं चंद्रग्रहण आज, कुठे आणि कधी होणार जाणून घ्या

Lunar Eclipse 2020: वर्षातलं तिसरं चंद्रग्रहण आज, कुठे आणि कधी होणार जाणून घ्या

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै : आषाढ पौर्णिमेच्या दिवशी रविवारी तिसरं चंद्रग्रहण होणार आहे. हे उपछाया चंद्रग्रहण असणार आहे. यंदा पहिल्यांदाच 30 दिवसांमध्ये तीन ग्रहणांचा योग आला. त्यापैकी दोन ग्रहण ही भारतात दिसली होती. 5 जुलैला होणारं चंद्रग्रहण मात्र भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण उत्तर पूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड इथे दिसणार आहे. उपछाया चंद्रग्रहण म्हणजे काय? चंद्रग्रहण ही एक खगोलीय स्थिती आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्रा एका ओळीत असतात तेव्हा साधारण चंद्रग्रहण होते. मात्र चंद्राचा एकच भाग यावेळी लपवला जातो तेव्हा त्याला अर्ध चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. पण असं न करता चंद्र बाहेर पडतो तेव्हा त्याला उपछाया ग्रहण म्हणतात. या ग्रहणात कोणतंही सुतक पाळलं जात नाही. त्यामुळे मंदिर, अथवा पूजेसाठी प्रतिबंध घालण्यात येणार नाहीत. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याला स्थगिती किंवा मनाई केली जाणार नाही. पूजा पाठ आणि भोजन संबंधित कामे केली जातील. परंतु तरीही संयम बाळगणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. छायाकल्प 05 जुलै रोजी होईल. भारत, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासह दक्षिण आशियाच्या काही भागात ते दृश्यमान असेल. चौथे छायाकल्प चंद्र ग्रहण 30 नोव्हेंबरला होणार आहे. ते ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिसेल. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर (Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ याची पुष्टी करत नाही. अंमलबजावणीपूर्वी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क साधावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या