प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 07 मार्च : लहान किंवा तरुण वयात नजर अंधुक (Blurred vision) होण्याचं मुख्य कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तविक, तरुण वयात कमी दिसू लागण्यामागं अनेक कारणं असतात. हल्ली तरुण किंवा लहान मुलांमध्ये दृष्टी कमी होणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. खराब जीवनशैली, चुकीच्या पद्धतीनं वाचन करणं (Reading), जास्त टीव्ही पाहणं (Watching Tv) किंवा मोबाईल वापरणं (Mobile Use) ही त्याची प्रमुख कारणं असल्याचं मानलं जाते. दृष्टी कमी होण्याची लक्षणं वारंवार डोकेदुखी, अंधुक दिसणं आणि डोळे लाल होणं ही दृष्टी कमी होण्याची लक्षणं आहेत. अनेकांना दृष्टी कमी होण्याचा त्रास होत आहे. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांना भेटलं पाहिजे. या कारणांमुळं कमी होते दृष्टी अनेक कारणांमुळं दृष्टी कमी होत असली तरी त्यात न्यूरोलॉजिकल समस्यांचाही समावेश होतो. न्यूरोलॉजिकल समस्या हे अस्पष्ट दृष्टी किंवा कमी वयात दृष्टी कमी होण्याचं मुख्य कारण मानलं जातं. यामुळं लहान वयातच दृष्टी कमजोर होते. हे वाचा - उरलेले साबणाचे तुकडे वापरून असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्चच नको लहान वयात कमी दिसणं हे अनुवांशिक देखील आहे अनुवांशिक कारणांमुळं लहान वयातच कमी दिसू लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कुटुंबातील सदस्याला अल्बिनिझम रोग किंवा रेटिनाइटिस पिगमेंटोसा असेल तर या स्थितीत मुलांमध्ये डोळे कमकुवत होऊ शकतात, असं मानलं जातं. यात कमी वयात अंधुक दृष्टी होऊ शकते किंवा अगदी अंधत्व देखील येऊ शकतं. हे वाचा - दिवसा झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या झोपेविषयी माहिती (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)