JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सावधान! कोल्ड-ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये पाणी साठवणं ठरू शकतं धोकादायक

सावधान! कोल्ड-ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये पाणी साठवणं ठरू शकतं धोकादायक

कोल्ड ड्रिंक किंवा मिनरल वॉटरच्या बाटल्या जास्त काळ फ्रीजमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरल्या जातात. हे जितकं सोयीचं वाटतं, तितकंच ते आपल्यासाठी धोकादायकदेखील ठरू शकतं.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : उन्हाळा सुरू झाला, की थंडावा देणाऱ्या सगळ्या वस्तूंचा वापर वेगाने सुरू होतो. घरातलं वातावरण थंड ठेवण्यासाठी घरात कूलर वापरले जातात. थंड पेयांच्या साह्याने जिवाला गारवा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. कधी ही थंड पेयं घरी बनवली जातात, तर कधी बाजारातून कोल्ड ड्रिंक्स (Cold Drink) आणली जातात. शरीराला उन्हाळ्यात थंड पाण्याची खूप गरज भासते. कोल्ड ड्रिंक्स पिऊन झाल्यानंतर, त्यांच्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जात नाहीत. त्या स्वच्छ धुऊन त्यांचा वापर फ्रीजमध्ये प्यायचं पाणी भरून ठेवण्यासाठी केला जातो. कोल्ड ड्रिंक किंवा मिनरल वॉटरच्या बाटल्या जास्त काळ फ्रीजमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरल्या जातात. हे जितकं सोयीचं वाटतं, तितकंच ते आपल्यासाठी धोकादायकदेखील ठरू शकतं. होय, तुम्ही अगदी योग्य वाचलं आहे. कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवून फ्रिजमध्ये ठेवणं आपल्यासाठी हानिकारकदेखील ठरू शकतं. याबद्दलची सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘TV 9 हिंदी’ने प्रकाशित केलं आहे. प्लास्टिक बाटल्यांमध्ये (PLastic Bottle) साठवलेल्या पाण्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक्षमतेला (Immune System) हानी पोहोचू शकते. अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे. प्लास्टिक बाटलीमध्ये तयार होणाऱ्या रसायनांमुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्लास्टिकमध्ये असलेल्या फॅथलेट्स (Phthalates) या रसायनांमुळे लिव्हर कॅन्सर (Liver Cancer) होण्याचादेखील धोका संभवतो. या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये जास्त काळ पाणी साठवून ठेवल्याने फ्लुओराइड (Fluoride) आणि आर्सेनिक (Arsenic) हे घटक तयार होतात. हे घटक शरीरासाठी अतिशय धोकादायक असतात. हे घटक शरीरात स्लो पॉयझनसारखे (Slow Poison) काम करतात, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे प्लास्टिक बाटलीमध्ये जास्त काळ पाणी साठवून ठेवल्यामुळे कालांतराने त्यामध्ये जिवाणू (Bacteria) तयार होऊ शकतात. त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास संभवतो. कॅलरीज म्हणजे काय? आपल्याला एका दिवसात किती कॅलरीज आवश्यक आहे? या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवलेलं पाणी जेव्हा उन्हाच्या संपर्कात येतं किंवा वाढलेल्या तापमानामुळे गरम होतं, तेव्हा त्यामध्ये विषारी तत्त्वं तयार होतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. प्लास्टिकच्या बाटलीमध्ये जास्त काळ पाणी साठवल्यामुळे त्यामध्ये बीपीए म्हणजेच बायफिनिल ए (Biphenyl A) हे रसायन तयार होतं. या रसायनामुळे पचनक्रिया प्रभावित होते आणि खाल्लेलं अन्न पचण्यास त्रास होतो. यासोबतच या रसायनामुळे शरीराचं वजन वाढणं (Obesity), मधुमेह (Diabetes) यांसारख्या अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो. प्लास्टिक बाटली वापरल्यामुळे केवळ आपल्या शरीराचंच नुकसान होतं असं नाही. प्लास्टिकचं विघटन होत नसल्यामुळे त्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यामुळे प्रदूषणाची समस्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळे केवळ घरातच नाही तर इतर ठिकाणीही आपण प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर करणं टाळायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या