JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुरुषांनाही असतो या कामात Interest; समाजाने स्वीकारला बदल

पुरुषांनाही असतो या कामात Interest; समाजाने स्वीकारला बदल

घर आवरणं, फॅशन करणं, स्वयंपाक करणं ही टिपीकल म्हणवली जाणारी कामं पुरुष आनंदाने आणि आवडीने करू लागले आहेत. हळवा पुरुष, कणखर स्त्री अशी कपल्सही उघडपणे त्यांचे स्वभाविशेष कबुल करू लागले आहेत. काय वाटतं तुम्हाला? आपला समाज समानता स्वीकारतोय?

जाहिरात

एका महिलेने असा दावा केला की घरकामात मदत करणाऱ्या नवऱ्याला त्याबदल्यात तिला पैसे द्यावे लागतात. तर, एकजण म्हणाली की माझीही हिच परिस्थिती आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 12 मे : काही कामांची माणूस जन्माला येतानाच त्यांची वाटणी झालेली असते. स्त्रीवादी विचारांमध्ये अशी वाटणी मान्य नसली तरी अनेक घरांमध्ये सर्रास अशी कामाची विभागणी दिसते. आता हे प्रमाण कमी होत आहे. स्त्रियांनी कोणती कामं करावीत आणि पुरुषांनी काय करावं हे समाजचं ठरवतो. वयानुसार या जबाबदाऱ्या वाटल्या जातात. मग महिला किंवा पुरुषांनी कसे कपडे घालावेत (****Dressing Style)? कसं वागावं? त्यांच्या जबाबदाऱ्या कशा असव्यात ?  हे समाज (Society) ठरवतो. ( कोरोना नियंत्रण कसं करायचं मुंबई, पुण्याकडून शिका; मोदी सरकारने केलं कौतुक ) पण, काळानुसार पुरुष आणि महिलांबद्दलची धारणा बदलायला लागली आहे. त्यामुळे समाजात बदल झाला आहे. पूर्वी महिलांचे कपडे महिलाच घालायच्या असे कपडे पुरुषांनी घातले तर, त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जायचं. पण, आता तर पुरुषही कॉस्मेटीक (Cosmetic), मेकअप प्रोडक्ट (Makeup Product) वापरतात. तर, मुली आता फॅशनमध्ये पुढे गेल्यात मुलांप्रमाणे कपडेही आता मुली घालतात. पैसे कमावण्यात भेदभाव नाही आता घरातली कामं सांभाळून मुलांची जबाबदारी घेऊन, काम करणाऱ्या पुरुषांची संख्या वाढत आहे. पूर्वी असा समज होता की, पुरुष घराबाहेर जाऊन पैसे कमावणार आणि महिला मुलं, घरातली कामं करणार पण, आता जमाना बदला आहे. महिला आणि पुरुष घराबाहेर जाऊन कामं करतात आणि पुरुष महिलांच्याबरोबरीने घरातली कामं करत मुलांनाही सांभाळतात. ( कोरोना रुग्णांना Ivermectin देऊ नका; भारतात औषधाचा वापर, WHO ने केलं सावध ) भावनांना महत्त्व पुरुषांनी भावनाप्रधान नसावं उलट कोणत्याही प्रसंगात कठोर राहणं, ठाम राहणं, हिंमतीने डिसीजन घेणं अशीच अपेक्षा पुरुषांकडून केली जात होती. पण, आता इमोशनल (Emotional) पुरुषांना कमजोर समजलं जात नाही. आता समानतेचा (Equally) काळा आहे. त्यामुळे कठीण प्रसंगात पुरुष सहजतेने रडू शकतात. तर, महिला हिंमतीने गोष्टींचा सामना करतात. पण, म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात नाही. ( Explainer : कोविड रुग्णांना होणारा Mucormycosis आजार नेमका आहे तरी काय? ) ऍडवेंचर आणि आवडीला महत्व आता महिला मोठं ओझ उचलू शकतात किंवा पुरुष आवडीने घर सजवू शकतात. आजच्या जमान्यात जे पुरुष जीमध्ये जाण्याऐवजी घरातच योगा करतात त्यांना वेगळं समजलं जात नाही. महिला आता ड्रायव्हिंग करतात, ट्रेकिंग, आउटींग यातल्या कोणत्याही गोष्टी महिला करु शकतात. त्यात काहीच गैर नाही असा विचार करणारा हा काळ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या