रेफ्रिजरेटर व्यवस्थित साफ न केल्यास,अन्न पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात.
नवी दिल्ली, 20 जुलै: पावसाळ्यात आजार वाढण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढलेली असते. त्यामुळे आजांरापासून वाचण्यासाठी,आपण स्वच्छतेची (Cleaning) काळजी घेणं महत्वाचं आहे. खासकरून स्वयंपाकघर आणि खाद्यपदार्थांची स्वच्छता खुप महत्वाची आहे. थोडासाही निष्काळजीपणा**(Negligence)** आपल्या संपूर्ण कुटुंबाला आजारी पाडू शकतो. किचनप्रमाणे फ्रिजची स्वच्छता (Fridge Cleaning) महत्वाची असते. कारण आपण खाण्यापिण्याची सर्व वस्तू फ्रिजमध्ये ठेवत असतो. रेफ्रिजरेटर व्यवस्थित साफ न केल्यास,अन्न पदार्थांमध्ये बॅक्टेरिया (Bacteria) वाढू शकतात. कधीकधी फ्रिज इतका खराब होतो की, त्याला खराब वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत फ्रिजची साफसफाई योग्य वेळी केली पाहिजे. फ्रिज सहजपणे साफ करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊयात. फ्रिज साफ करण्याची पद्धत फ्रिज साफ करण्यापूर्वी पूर्णपणे रिकामा करून बटण बंद करा. सर्व भाज्या आणि फळं हवेशीर ठिकाणी ठेवा. फ्रीजच्या खाली जाड कापड आणि कागद घाला. आता फ्रिज डी-फ्रॉस्ट करा. यामुळे फ्रिजमधून बाहेर पडणारं पाणी पसरणार नाही. ( असं काय घडलं की सगळं गावच्या गाव झालं Underground ,पाहा PHOTO ) फ्रिजला दुर्गंधी येत असेल तर एका भांड्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस मिसळा, त्याने फ्रिजचा आतला भाग पुसून टाका. फ्रिज साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. एका भांड्यात थोडं गरम पाणी घाला आणि त्यात मीठ घाला आणि कपड्याच्या साहाय्याने फ्रिज स्वच्छ करा. ( आश्चर्यच! आंबटही लागतं गोड; Miracle Fruit चवच बदलून टाकतं, कशी होते ही जादू? ) पुसल्यानंतर फ्रिज तासाभर उघडा ठेवा. डाग पडले असेतील तर आपण साबणाने स्वच्छ करा. फ्रिजमधील सर्व ट्रे बाहेर काढा आणि चांगले धुवा. कोरडे झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. ( खरंच तुम्ही खात असलेल्या Cadbury Chocolate मध्ये Beef आहे? ) लसूण कधीही फ्रिजमध्ये उघडा ठेवू नका. त्याचा वास फ्रिजमध्ये पसरतो. फिजमध्ये ठेवताना सर्व खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवा. साफ केल्यावर फ्रिजमधून वास येत असेल तर फ्रिज व्हिनेगरने साफ करा.