JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रोज सकाळी कॉफी पिता? तुमची ही सवय आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम

रोज सकाळी कॉफी पिता? तुमची ही सवय आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम

कॉफी बर्‍याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र कॉफी पिण्याचे काही फायदे असले तरी तोटेदेखील आहेत. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे काही गंभीर दुष्परिणाम आहेत.

जाहिरात

रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे दुष्परिणाम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी : कॉफी पिणे हे एक व्यसन आहे, जे फक्त कॉफी प्रेमींनाच समजेल. एक कप ताज्या बनवलेल्या कॉफीशिवाय त्यांचा दिवस सुरु होऊ शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते कामाच्या ठिकाणी, लोकांना नियमित कॉफी हवी असते. कॉफी बर्‍याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र कॉफी पिण्याचे काही फायदे असले तरी तोटेदेखील आहेत. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे काही गंभीर दुष्परिणाम आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. पाहुयात रिकाम्यापोटी कॉफी पिण्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात.

वेट लॉसपासून दम्यापर्यंतच्या त्रासांवर फायदेशीर आहे पांढरा भोपळा, वाचा अद्भुत फायदे

हार्मोनल असंतुलन सकाळी रिकाम्यापोटी कॉफी प्यायल्याने हार्मोनल असंतुलन होते. कॉफी रक्तप्रवाहात मिसळली की ती तुमच्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढवते, ज्यामुळे ओव्हुलेशनवर परिणाम होतो आणि वजन वाढते. परिणामी तुमचे तणाव संप्रेरक देखील ट्रिगर होतात, तुमचे शरीर लढा किंवा फ्लाइट मोडमध्ये घेऊन जाते, ज्यामुळे हार्मोनल मुरुम वाढतात आणि तुम्हाला अस्वस्थ वाटते.

पोटाच्या समस्या मळमळ, पोटात गोळा येणे, अपचन आणि गॅसेस यासारख्या अनेक जठरासंबंधी समस्यांचे मुख्य कारण म्हणजे सकाळी रिकाम्यापोटी कॉफी पिणे. कॉफीमुळे गॅस्ट्रिक ऍसिडचे उत्पादन वाढू शकते. पोटातील विषारी ऍसिडची ही वाढ शरीराच्या पचनक्रियेवर प्रतिकूल परिणाम करते. त्यामुळे कप कॉफी पिण्यापूर्वी तुम्ही फळे खाऊ शकता. कोलेस्टेरॉलवर परिणाम होतो कॉफीमध्ये डायटरपेन्स म्हणून ओळखले जाणारे फॅटी पदार्थ देखील असतात, जे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. जंक फूडचे सेवन, धूम्रपान, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव याशिवाय, मोठ्या कप कॉफी पिल्याने हृदयविकार आणि पॅरालिसिसचा धोका वाढतो.

चू-ही-चा, अळ्यांच्या विष्ठेपासून तयार झालेला चहा; वाचा कसा लागला शोध?

संबंधित बातम्या

मूड स्विन्ग्स सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने मूड स्विन्ग्स होऊ शकतात. तुम्हाला एका क्षणी आनंदी आणि दुसऱ्या क्षणी दुःखी वाटू शकते. कॉफी तुमच्या मूडवर खूप वेगवेगळे परिणाम करते असे मानले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या