JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नाआधी Virginity गमावल्यामुळे तरुणींवर आली ही वेळ; डॉक्टरही संतापले!

लग्नाआधी Virginity गमावल्यामुळे तरुणींवर आली ही वेळ; डॉक्टरही संतापले!

कौमार्य चाचणीत नापास झालेल्या महिलांची हत्या (Murder) झाल्याचंही अनेक प्रकरणंसमोर आलं आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 जुलै : जगभरातल्या अनेक देशांमध्ये मुलीची लग्नाआधी कौमार्य चाचणी म्हणजेच व्हर्जिनिटी टेस्ट (Virginity Tests) केली जाते. कायद्याने बंदी असली तरी महाराष्ट्रातही कौमार्य चाचणी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही समुदायांमध्ये लग्नाआधी वधूची कौमार्य चाचणी करण्याची प्रथा असल्याचं पाहायला मिळतं. फक्त मोजक्याच काही भागांमध्ये किंवा समुदायामध्ये कौमार्य चाचणीची प्रथा आढळते; पण ही प्रथा अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे मुली कौमार्य चाचणीत पास होण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार घेत असल्याच्या बाबीही समोर आल्या आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल; पण इराणमध्ये (Iran) कौमार्य चाचणीच्या आधारे हुंड्याची (Dowry) रक्कम ठरवली जाते. इराणमध्ये राहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींची लग्नापूर्वी कौमार्य चाचणी केली जाते. ही चाचणी कोणत्याही वैद्यकीय आधाराशिवाय केली जाते. या चाचणीत अपयशी ठरलेल्या महिलांना हायमेन दुरुस्तीची शस्त्रक्रिया (Surgery) करण्यास भाग पाडलं जातं. कौमार्य चाचणीत नापास झालेल्या महिलांची हत्या (Murder) झाल्याचंही अनेक प्रकरणंसमोर आलं आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. कौमार्य चाचणीसाठी कोणताही वैद्यकीय (Medical) आधार नसूनही इराणमध्ये राहणारे लोक या चाचणीसाठी मुलींवर दबाव आणतात. या चाचणीबद्दल बोलताना हे कॅरेक्टर सर्टिफिकेट (Character Certificate) अजिबात आवडत नसल्याचं इराणच्या महिलांचं म्हणणं आहे. कारण त्यासाठी त्यांना एका विचित्र चाचणीतून जावं लागतं. कौमार्य चाचणीसाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या एका महिलेनं सांगितलं की, तिला इथे यायला अजिबात आवडत नाही; पण कौटुंबिक दबावामुळे तिला हे करावे लागतंय. व्हर्जिनिटीचा पुरावा देणं म्हणजे माझ्या चारित्र्याचा अपमान आहे. हे एक प्रकारे माझ्या प्रायव्हसीवर आक्रमण आणि लैंगिक छळ आहे, असं इराणमध्ये राहणाऱ्या आणखी एका महिलेने सांगितलं. तसंच कौमार्य चाचणीबाबत रेडिओ फ्री युरोपशी बोलताना इराणमधील एका डॉक्टरने सांगितलं की, या चाचणीसाठी वरपक्षाकडून दबाव आणला जातो असं नाही, तर बऱ्याच वेळा मुलीचं कुटुंब या चाचणीसाठी मुलीवर दबाव आणतात. माझ्या निरीक्षणानुसार 90 टक्के प्रकरणांमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनाच आपल्या मुलीची ही चाचणी करून घ्यायची असते. त्याचबरोबर अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा मुलीवर पूर्ण विश्वास असतो आणि तो कौमार्य चाचणीला नकार देतो. मात्र तरीही मुलीचेच कुटुंबीय मुलीवर कौमार्य चाचणीसाठी दबाव टाकतात. बऱ्याचदा जेव्हा मुलं आमच्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा मला हा विचार करून आश्चर्य वाटतं की खरंच ते व्हर्जिन आहेत का? किंवा त्यांची व्हर्जिनीटी टेस्ट घेतल्यास ते त्यात पास होतील का?, असंही या डॉक्टरने सांगितलं. समानेह सवादी नावाच्या महिला हक्क कार्यकर्तीने तिच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, अशा चाचण्या स्त्रियांवरील हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, ज्याची कोणतीही मेडिकल व्हॅलिडीटी (medical validity) नाही. या परीक्षेमुळे महिलांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसतो; पण तरीही आपल्या समाजात अशा चाचण्या जाहीरपणे केल्या जात आहेत. इराणमध्ये लोक त्यांच्या मुली आणि पत्नींना मेडिकल सेंटरमध्ये (Medical Centre) घेऊन जातात आणि त्यांची चाचणी करवून घेतात. इराणच्या काही भागात कौमार्यासंबंधी या कुप्रथा अजूनही पाळल्या जातात. या प्रथांनुसार लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या पलंगावर पांढरी चादर किंवा रूमाल ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यावर रक्ताच्या खुणा आहेत की नाही ते पाहिलं जातं. याशिवाय कौमार्य चाचणीत फेल होणाऱ्या महिलांवर हायमेन रिपेअर सर्जरी (Hymen repair surgery) करण्यासाठी दबाव टाकला जातो. यासाठी इराणमध्ये खूप पैसाही खर्च केला जातो. इराणमधील स्त्रीरोगतज्ज्ञ फरिमा फराहानी म्हणतात की दुर्दैवाने, ही हायमेन दुरुस्ती शस्त्रक्रिया इराणमध्ये पैसे कमवण्याचा सर्वांत मोठा मार्ग बनलाय. हायमेन रिपेअर करताना स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टचा भाग शिवला जातो. जेव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा हा शिवलेला भाग उघडला जातो आणि त्यामुळे रक्तस्त्राव होतो. त्यावरून संबंधित तरुणी व्हर्जिन (Virgin) होती, असं समजलं जातं. इराणमध्ये ही प्रथा सर्रास मानली जात असली तरी मेडिकल सायन्समध्ये (Medical Science) या सर्जरीला कोणतीही मान्यता नाही. जेंडर रिसर्चर झायरा बघेर-शाद यांनी सांगितले की, कौमार्य चाचणीत अपयशी ठरणाऱ्या महिलांवर खूप अत्याचार होतो. त्यांना अनेक वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. जेव्हा एखादी मुलगी कौमार्य चाचणीत फेल होते किंवा तिने लग्नाआधी गैर-पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्याचं कळतं तेव्हा तिचा जीवही घेतला जातो. इराणमध्ये या कुप्रथेमुळे अनेक महिलांची हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कायद्याने बंदी असूनही या देशात सर्रास व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या