JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / International Dog Day 2022: मालकाचं आयुष्य आणखी आनंदी बनवतो कुत्रा, पाळण्याचे आहेत हे फायदे

International Dog Day 2022: मालकाचं आयुष्य आणखी आनंदी बनवतो कुत्रा, पाळण्याचे आहेत हे फायदे

कुत्र्यांमध्ये एक विशेष प्रतिभा आहे की, ते त्याच्या मालकाच्या भावना जाणू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा मालक दु:खी, आनंदी, तणाव इत्यादी असतो, तेव्हा तो ते अनुभवतो आणि मालकाला आराम आणि सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : आज 26 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला जात आहे. लोकांना घरात कुत्रा पाळण्यासाठी प्रवृत्त करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पाळीव प्राण्यांविषयी या दिवशी जागृती केली जाते. कुत्र्यांचे आणि माणसांचे नाते खूप जुने असले तरी कोरोनाच्या काळात पाळीव कुत्र्यांचे महत्त्व लोकांना समजले. त्यांचे बिनशर्त प्रेम आणि मालकाची काळजी घेणे, यामुळे घरातील वातावरण तर आनंददायी बनवतेच, पण जीवनातील एकटेपणा दूर ठेवण्यासही मदत होते. जगात असे फार कमी लोक आहेत ज्यांना मानवाचा हा प्रेमळ मित्र आवडत नाही. आजच्या स्पेशल दिवशी जाणून घेऊया, कोणत्या कारणांसाठी आपण कुत्रा पाळला पाहिजे आणि त्यांना पाळल्याने आपल्या आयुष्यात कोणते बदल होतात. यासाठी पाळीव श्वान घरी असावा - भावनिक आधार - पाळीव प्राणी, विशेषतः कुत्रे, त्यांच्या मालकासाठी आणि कुटुंबासाठी सर्वोत्तम भावनिक आधार असतात. कुत्रा हा त्याच्या निष्ठा आणि सहवासासाठी ओळखला जातो. कुत्र्यांमध्ये एक विशेष प्रतिभा आहे की, ते त्याच्या मालकाच्या भावना जाणू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा मालक दु:खी, आनंदी, तणाव इत्यादी असतो, तेव्हा तो ते अनुभवतो आणि मालकाला आराम आणि सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तो कुटुंबातील जबाबदार सदस्याप्रमाणे तुमची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. अ‌ॅक्टिव राहण्यास मदत होते - घरात कुत्रा असेल तर त्याला खाऊ घालणे, फिरणे वगैरेचा दिनक्रम तुमचाही राहतो. त्यामुळे तुम्ही बाहेरही फिरता, त्यामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कायम राहते. सोशल टच वाढतो - खरं तर, जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत बाहेर फिरता तेव्हा तुमचा सोशल टच वाढण्याची ही एक उत्तम संधी असते. चालत जाऊन तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना रोज भेटता आणि अनेक नवीन लोकांशी संवादही साधता. अशा प्रकारे तुमचे सोशल नेटवर्क वाढण्यास मदत होते. तणाव दूर होतो - जर तुम्ही तणावाखाली असाल आणि एखाद्या गोष्टीची काळजी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही तुमच्या कुत्र्यासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, थोडं खेळा. तो तुमच्यासोबत बराच वेळ घालवेल आणि तुमचा तणाव कमी झाल्याचे जाणवेल. चांगले रुटीन - तुमच्याकडे कुत्रा असेल तर तुम्ही त्याला सकाळ संध्याकाळ फिरायला घेऊन गेला असेल. इतकंच नाही तर त्याला पार्कमध्ये खेळणं तुमच्यासाठी उत्तम व्यायाम आणि कसरत करण्याचं कारणही बनेल. अशा प्रकारे तुम्ही दीर्घायुष्य चांगली दिनचर्या पाळू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या