जागतिक बालिका दिवस
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : दरवर्षी 11 ऑक्टोबर हा जागतिक बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. मुलींचं शिक्षण, सुरक्षितता आणि बालविवाहाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं आजच्या (11 ऑटोबर) दिवसाचं महत्त्व आहे. मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठीही हा दिवस नक्कीच योग्य ठरेल. त्यासाठीचे काही महत्त्वाचे पर्याय जाणून घ्या. तुमच्या मुलीचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी त्यांची नक्कीच मदत होईल. मुलींसाठीची गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड, आरडी, एफडी, सुकन्या योजना असे काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पर्यायांची माहिती देत आहोत. सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या आर्थिक समृद्धीसाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली. या अंतर्गत बँकेत किंवा पोस्टात जास्तीतजास्त 2 मुलींसाठी सुकन्या योजनेचं खातं उघडता येतं. त्यात वर्षाला कमीतकमी 1 हजार व जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेवर सरकार सध्या 7.6 टक्के व्याज देत आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर ते पैसे काढता येतात. चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंड मुलींसाठी तयार करण्यात आला आहे. यात गुंतवलेली रक्कम डेट आणि इक्विटी अशा दोन्ही पर्यायांमध्ये जाते. ही रक्कम 18 वर्षांसाठी ठेवावी लागते. यामुळे जास्त कालावधीत अधिक पैसे जमवता येऊ शकतात. हेही वाचा - Success Story : IAS होण्यासाठी ‘तिनं’ सोडली लाखो रुपये पगाराची नोकरी; IPSपतीनं केली अशी मदत एनएससी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) ही पोस्टाची मुलींसाठी सुरू असलेली योजना आहे. यात खात्रीशीर परतावा मिळतो. सरकार सध्या एनएससीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. यात एका वर्षात कमीतकमी 1 हजार व जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवता येतात. ही योजना 5 वर्षांसाठी असते. त्यावर करसवलतही मिळते. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट ही मुलींच्या दृष्टिने चांगली योजना आहे. त्याचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. हे खातं देशभरात कुठेही बदलून घेता येऊ शकतं. यात वर्षाला कमीतकमी 1 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता. यावरील व्याजदर सतत बदलत असतो. युलिप युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन (ULIP) मुलींसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यात जीवन विम्याच्या हमीसोबतच ठरलेल्या परताव्याचीही खात्री असते. पालकांचा मृत्यू झाल्यास, विमा कंपनी प्रीमिअमचे हप्ते भरते. मुलीच्या शिक्षणाचा खर्चही कंपनी उचलते. एसआयपी म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीद्वारेही मुलींसाठी चांगली रक्कम गुंतवता येते. बँकेत एसआयपी खातं उघडल्यावर तुमचे पैसे इक्विटी, डेट आणि मिक्स फंडांमध्ये गुंतवले जातात. यामुळे भविष्यात मोठी रक्कम मिळू शकते. हेही वाचा - या बँका देताएत एफडीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज, एका सरकारी बँकेचाही समावेश पोस्टातील आरडी पोस्टातील रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी हाही गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. याचा कालावधी 5 वर्षांचा असतो, मात्र पालक हा कालावधी वाढवून मोठी रक्कम जमा करू शकतात. ही गुंतवणूक जोखमीची नसते. तसंच यावर ठरलेलं व्याजही मिळतं. पीपीएफ पीपीएफचं खातं मुलीच्या नावावर उघडून त्यात गुंतवणूक करता येऊ शकते. त्याचा कालावधी 15 वर्षांचा असतो. मात्र अजून 5 वर्षं वाढवता येऊ शकतो. बँक किंवा पोस्टात याचं खातं उघडून वर्षभरात कमीतकमी 500 रुपयांपासून सुरुवात करता येते. वर्षाला जास्तीतजास्त दीड लाखांची गुंतवणूक करता येते. त्यावर 7.10 टक्के व्याज मिळतं. गोल्ड ईटीएफ मुलींसाठी सोन्याचे दागिने किंवा सोनं घेण्याऐवजी गोल्ड ईटीएफमध्ये पालकांनी गुंतवणूक करावी. याला लॉकरची गरज नसते व याची चोरीही होत नाही. शेअर बाजारासारखाच परतावा यातून मिळतो. मात्र सोन्याचे दर वाढले, की याचेही दर वाढतात. एफडी मुलीच्या नावानं एफडी करणं हा गुंतवणुकीचा सर्वांत लोकप्रिय पर्याय आहे. एका ठराविक रक्कमेची गुंतवणूक करायची असेल, तर एफडी हा उत्तम पर्याय आहे. यात वेळेआधी पैसे काढता येऊ शकत नाहीत. त्यामुळे मोठी रक्कम जमवता येते. एफडीवर बँका सध्या 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
मुलींचं भविष्य सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी आर्थिक सुरक्षा महत्त्वाची असते. त्यासाठी गुंतवणुकीच्या वरील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडता येईल.