JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भारत ते सिंगापूर; 20 दिवस, 4 देश, 4500 किमी चक्क लक्झरी बसमधून प्रवास, खरंच आहे अशी टूर

भारत ते सिंगापूर; 20 दिवस, 4 देश, 4500 किमी चक्क लक्झरी बसमधून प्रवास, खरंच आहे अशी टूर

भारतातून सिंगापूरला नेणारी ही बस कुठून सुटणार, 5 देशांत फिरत फिरत जाणाऱ्या या टूरचा खर्च किती आणि इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुरुग्राम, 28 जानेवारी:  परदेशी जायचे असेल तर आपण विमानानं जातो. अगदीच वेगळा अनुभव म्हणून क्रुझचा पर्याय निवडला जातो; पण बसने (BUS )असा प्रवास करायचा म्हटलं तर ते कोणालाही पटणार नाही. अशक्य वाटेल; पण गुरूग्राममधील (Gurugram)एका कंपनीनं ते शक्य करून दाखवलं आहे. त्यांनी चक्क भारत ते सिंगापूर (India to Singapore) हा प्रवास बसनं करण्याची संधी उपलब्ध केली आहे. ही बससुद्धा साधीसुधी नाही तर अलिशान आहे. इतका लांबचा प्रवास अतिशय आरामदायी होईल, याची सर्व काळजी या बसमध्ये घेण्यात आली आहे. भारत ते ब्रिटन म्हणजे दिल्ली ते लंडन (Delhi to London) असा साहसी प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ‘अॅडव्हेंचर अवर लँड’ (Adventure Our land) या कंपनीनं भारत ते सिंगापूर या नव्या प्रवासाची योजना आखली आहे. भारतातून सिंगापूरला पोचण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागणार असून, 4500 किलोमीटरचे अंतर पार केले जाणार आहे. या प्रवासात पाच देशांना भेट देता येणार आहे. विशेष म्हणजे बराचसा प्रवास समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावरून होणार असल्यानं तो अतिशय रमणीय असणार यात शंका नाही. भारतातून सिंगापूरला विमानानं गेल्यास अवघ्या काही तासात पोहोचता येतं, मात्र बसनं केल्या जाणाऱ्या प्रवासातील थरार त्यात अनुभवता येणार नाही. या प्रवासासाठी कंपनीनं बुकिंग सुरू केलं आहे. 14 नोव्हेंबरपासून या बस प्रवासाला सुरुवात होणार आहे. कुठून सुरू होणार आणि कसा असेल मार्ग ? भारतातील ईशान्येकडील राज्य मणिपूरची राजधानी इम्फाळमधून(Imphal) या प्रवासाला सुरुवात होईल. म्यानमार, थायलंड आणि मलेशिया यांना भेट देत सिंगापूरला ही बस पोहोचेल. इम्फाळमधून म्यानमारमधील कोल, बगान यांना भेट देऊन यांगूनमधून थायलंडमध्ये प्रवेश केला जाईल. इथे बँकॉक आणि क्राबी या ठिकाणांना भेट देऊन मलेशियात प्रवेश होईल, तिथून सिंगापूरमधील क्वालंलापूर इथं ही बस पोहोचेल. बसमधील सुविधा : या बसमध्ये आरामदायी सीट्स असून, दोन सीट्समध्ये अत्यंत आरामदायीपणे वावरता येईल इतकं अंतर आहे, तसंच खासगीपणा जपण्यासाठी पार्टीशन्सही आहेत. बसमध्ये टॉयलेटचीही सोय आहे. एक छोटसं किचन असून तिथं खाण्याचे पदार्थ, रेडी टू इट पदार्थ मिळतील. अल्कोहोल ड्रिंक्सचीही सोय असेल. फर्स्ट एडची सुविधा, वायफाय कनेक्टीव्हिटी आदी सर्व सोयी आत असतील. किती खर्च : या प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंग करायचे असून प्रथम येणाऱ्यास प्रथम स्थान या तत्वावर बुकिंग मिळेल. या बसमधून 20 प्रवासी प्रवास करू शकतात. या प्रवासासाठी तब्बल सहा लाख रुपये खर्च आहे. यामध्ये प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहणे, भोजन, ट्रान्सपोर्ट , व्हिसा शुल्क, एअरपोर्ट ट्रान्स्फर शुल्क यांचा समावेश आहे. आवश्यक बाबी : या प्रवासासाठी 2022 पर्यंत वैध पासपोर्ट (Passport) अत्यावश्यक आहे. पाच देशांना भेट देत असल्यान, व्हिसा ही आवश्यक आहे. कंपनी व्हिसासाठी मदत करण्यास तयार आहे. तुम्ही कोणती औषधे घेत असला तर ती जवळ ठेवा. सर्व मार्गावर बहुतांश वेळा शाकाहारी जेवण मिळेल. सोबत अमेरिकी डॉलर्स किंवा युरो असणे आवश्यक आहे. खास आकर्षणं : ही बस आशियातील सर्वांत मोठ्या रस्ते महामार्गावरून प्रवास करणार आहे. म्यानमारच्या बगान इथला हजारो पेगोडा,रंगूनमध्ये जुन्या ब्रह्मदेशी संस्कृतीचा अनुभव आणि भोजन, बँकॉक बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडविणारी अनेक प्रेक्षणीय स्थळं, क्राबीमधील समुद्र किनारे, निळा समुद्र, माऊन्ट जेराई, मलेशियात कॅमेरून हायलंडस यांना भेट देऊन क्वालंलपूरमध्ये काही वेळ घालवून बस सिंगापूरला पोहोचेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या