JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सकाळी उठल्यावर कंबर दुखते?, तर असू शकतात ‘ही’ कारणं

सकाळी उठल्यावर कंबर दुखते?, तर असू शकतात ‘ही’ कारणं

पूर्वी ज्येष्ठांना होणारे अनेक आजार आता तरुणांनाही होऊ लागले आहेत. हल्ली तरुणांमध्ये कंबरदुखीचं प्रमाणही खूप वाढलंय.

जाहिरात

कंबरदुखी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: पूर्वी ज्येष्ठांना होणारे अनेक आजार आता तरुणांनाही होऊ लागले आहेत. हल्ली तरुणांमध्ये कंबरदुखीचं प्रमाणही खूप वाढलंय. बदलती लाईफस्टाइल, नीट झोप न झाल्यासही कंबरदुखी होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर कंबर दुखणं हा फार गंभीर आजार नाही. पण त्या त्रासामुळे हलतादेखील येत नाही. आपल्या शरीराची कोणतीही हालचाल करता येत नाही. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलंय. सकाळी उठल्याबरोबर कंबर दुखते, ती दिवसभर वाढत जाते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. या दुखण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यातील एक म्हणजे वृद्धत्व. वय वाढलं की त्यासोबत हाडांची घनताही कमी होऊ लागते, त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी होऊ लागते. अनेकदा त्यासाठी डॉक्टरांकडच्या फेऱ्या वाढतात. पेनकिलर्स घेऊन दुखणं कमी करावं लागतं. सकाळी होणाऱ्या या कंबरदुखीची कारणं नेमकी काय असू शकतात आणि त्यापासून आराम कसा मिळेल ते जाणून घेऊयात. हेही वाचा  -  Weight Loss साठी आवडीने खाता Cornflakes.. पण याने खरंच वजन कमी होतं का? कंबरदुखी का होते? चुकीच्या पद्धतीने कुशीवर वळल्यास रात्री झोपेत चुकीच्या पद्धतीने कुशीवर वळल्यास कंबर दुखते. जर तुम्ही एका अंगावर झोपत असाल तर ही सवय बदला. यासाठी रात्री किमान 4 ते 5 वेळा दोन्ही कुशींवर वळा. यामुळे कंबरदुखीमध्ये आराम मिळेल. ऑस्टिओपोरोसिस ऑस्टियोपोरोसिसमुळे कंबर दुखू शकते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडं हळूहळू कमकुवत होतात. ऑस्टियोपोरोसिसचा आजार असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. स्लिप डिस्क स्लिप डिस्कमध्ये गडबड झाल्यास सकाळी उठल्यावर कंबर दुखते. तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घ्या. कॅल्शियमची कमतरता शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास सकाळी उठल्यावर कंबर दुखते. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यायामाने मिळू शकतो आराम जर तुम्हाला कोणतंही इन्फेक्शन, डिस्कची समस्या किंवा संधिवात नसेल आणि दुखण्याचं कारण फक्त कमकुवत स्नायू असतील, तर तुम्ही साधा व्यायाम करायला हवा. यासाठी तुम्ही 4 योगासनं करू शकता. पवनमुक्तासन, बंधनासन, भुजंगासन किंवा नौकासन केल्यास तुम्हाला कंबरदुखीपासून आराम मिळेल. रोज कंबर दुखत असेल तर आपली दैनंदिन कामं करण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे यापासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य औषधोपचार करा जेणेकरून तुम्ही आनंदाने जगू शकाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या