JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पत्नीच्या चेहऱ्याचा पंचनामा

बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पत्नीच्या चेहऱ्याचा पंचनामा

बायकोचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी नवऱ्याने काय केलं पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै :  आपली बायकोच्या (Wife) चेहऱ्यामागे नेमकं काय दडलं आहे हे कोणत्याही नवऱ्यांना तसं सहसा उलगडणारं नाही. तुझ्या सौंदर्याचं (Woman beauty) रहस्य काय? असं एका जाहिरातीतही नवऱ्याने बायकोला (Wife beauty) विचारल्याचं तुम्हाला आठवलं असेल. बायकोच्या सौंदर्याबाबत (Beautiful wife) जाणून घेण्याची अशीच उत्सुकता असलेल्या एका नवऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. त्याने चक्क हातात वस्तरा, हातोडा घेऊनच आपल्या बायकोच्या चेहऱ्याचा पंचनामा केला आहे. नवरा-बायकोचा (Husband Wife) हा मजेशीर व्हिडीओ (Funny Video) सध्या चर्चेत आहे. ज्यात नवरा आपल्या सुंदर पत्नीच्या चेहऱ्यामागे नेमकं काय दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी विचित्र पद्धतीचा अवलंब करताना दिसतो.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता, बायको खुर्चीवर बसली आहे तिच्या बाजूलाचा नवरा उभा आहे. ज्याच्या एका हातात हातोडा आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. चमचा बायकोच्या गालावर ठेवून तो हातोड्याने ठोकतो. तेव्हा त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरून पावडर तिच्या ड्रेसवर पडताना दिसते. हे वाचा -  VIDEO - नवरीला पाहताच सुटला नवरदेवाच्या मनावरचा ताबा; स्टेजवरच ढासळला तोल आणि… नवरा जितक्या वेळा ठोकतो, तितक्या वेळा ती पावडर पडते. आता ही पावडर म्हणजे बायकोच्या चेहऱ्यावरील मेकअप (Makeup). तिने इतका मेकअप केला आहे. की तो असा खाली पडतानाही दिसतो आहे. नवरा आपल्या बायकोचा मेकअप उतरवतो. नवरा आपल्या बायकोचा नो मेकअप लूक दाखवण्याचा प्रयत्न करते. बायको आपली फोनमध्ये व्यस्त आहे. थोड्या वेळाने नवऱ्याच्या कृतीकडे तिचं लक्ष जातं  तेव्हा ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्यावर ओरडते. त्यानंतर नवरा लगेच थांबवतो. हे वाचा -  VIDEO - याला कुणीतरी आवरा! नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून तरुण हे करतोय तरी काय? निरंजन महापात्रा इन्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशरी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या