JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

जर तुम्हालाही जेवणावर कच्चे मीठ शिंपडण्याची सवय असेल तर काळजी घ्या, कारण तुमची ही सवय तुमच्या आरोग्याला गंभीरपणे हानी (effects of salt on health) पोहोचवू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : कोणत्याही अन्नामध्ये मीठाला खूप महत्त्व असते. जेवण कितीही चांगले मसाले घालून शिजवले तरी त्यात नियमित मीठ नसेल तर त्या पदार्थाला चव येत नाही. तसेच जेवणात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर अन्न कितीही चांगले शिजवले तरी ते खाणे शक्य नाही. म्हणजेच जेवणात मीठ नियमित ठेवल्याने चवही वाढते आणि आरोग्यही वाढते. पण, बर्‍याच लोकांना सवय असते की, स्वयंपाक झाल्यावर ताटात कच्चे मीठ घेऊन खातात. जे लोक जेवणात जास्त मीठ वापरतात त्यांच्याकडून असे अनेकदा केले जाते, जेणेकरून अन्नातील मीठाचे प्रमाण संतुलित ठेवता येईल. पण, शिजवलेल्या अन्नात कच्चे मीठ टाकणे आरोग्यासाठी किती हानिकारक (effects of salt on health) आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित नाही. तर चला मग आज आम्ही तुम्हाला नुकत्याच झालेल्या संशोधन बद्दल माहिती देणार आहोत. उच्च रक्तदाबाचा बळी शिजवलेल्या अन्नावर मीठ शिंपडून खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. याचे कारण असे की, मीठ शिजवल्यानंतर त्यात असलेले लोह सहज पचते. परंतु, आपली पचनसंस्था कच्चे मीठ पचवू शकत नाही. त्यामुळे हायपरटेन्शन होण्याची शक्यता वाढते. रोज एवढेच मीठ खा ज्याप्रमाणे मिठाच्या अतिसेवनाने शरीराला हानी पोहोचते, त्याचप्रमाणे शरीरात मिठाच्या कमतरतेमुळेही शरीराचे नुकसान होते. अनेक अभ्यासांच्या अहवालात हे सिद्ध झाले आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि आरोग्य तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने दिवसातून फक्त 2 छोटे चमचे मीठ खावे. त्याचबरोबर ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दिवसातून फक्त अर्धा चमचे मीठ सेवन करावे. Alert! Coronavirus नंतर आता Monkeypox virus चं संकट! या लक्षणांकडे दुर्लक्ष पडेल महागात हाडे कमकुवत होतात अन्नाच्या वर कच्चे मीठ खाण्याच्या सवयीमुळे किडनी स्टोन आणि ऑस्टिओपोरोसिस (हाडे कमकुवत होणे) सारखे धोकादायक आजार होऊ शकतात. मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याचेही संशोधनात समोर आले आहे. जे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाणही कमी करते. यामुळे हळूहळू व्यक्तीची हाडे कमकुवत होऊ लागतात. कच्चे मीठ खाल्ल्याने आरोग्यास हानी पोहोचते आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मिठाच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि अगदी दमाही होऊ शकतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कच्चे मीठ खाल्ल्याने हृदय आणि किडनीच्या आजाराचा धोकाही जास्त असतो. Corona Updates: पूर्णपणे लसीकरण होऊनही कोरोना झालेल्यांमध्ये लगेचच दिसतात ही 2 लक्षणं; असं तपासा जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने कमी तहान आणि जास्त भूक लागते. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की मिठाच्या अतिसेवनाने आरोग्यास गंभीर हानी पोहोचते. (Disclaimer : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणतीही कृती करण्याअगोदार आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या