JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा उपाय आणि वेदनांपासून मिळेल आराम

पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा उपाय आणि वेदनांपासून मिळेल आराम

पाय मुरगळल्यावर औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतो, मात्र यावर प्रभावी असे घरगुती उपचारही आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जर आपण चालण्यात थोडे निष्काळजी असाल किंवा आपले पाय जमिनीवर व्यवस्थित न टेकवता चालत असाल तर टाच मुरगळणे आणि यानंतर होणाऱ्या वेदना फारच असह्य असतात. वास्तविक पाय आणि तळव्यामधला जोड ही टाच आहे. myupchar.com शी संबंधीत एम्सच्या डॉ. के एम नाधीर यांनी सांगितलं, टाचेच्या वेदना सुरू होताच चालण्यात अस्वस्थता जाणवते, मात्र सामान्य समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्यास अस्वस्थता वाढू शकते. टाच मुरगळल्यास काय काळजी घ्यावी आणि घरगुती उपचारांद्वारे ते कसं बरं करावं हे जाणून घ्या- टाच मुरगळल्यास अशी घ्यावी काळजी

टाच मुरगळल्यास हे घरगुती उपचार करा myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणाले, टाचेमध्ये वेदना झाल्यास असे बरेच घरगुती उपचार आहेत ज्याद्वारे वेदना कमी करता येतात. औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतोच, मात्र घरगुती उपचार करणे देखील बरेच प्रभावी आहे. कोमट पाण्यात सैंधव मी****ठ घालून करा उपाय सैंधव मिठामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेट असते. पाय मुरगळल्यास एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक मूठभर सैंधव मीठ घाला आणि त्यात अर्धा तास पाय ठेवा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास फायदा होईल. अळशीचे तेलदेखील आराम देईल अळशीच्या तेलात अल्फा लिनोलिक नावाचं अॅसिड असतं. अळशीच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात घालून त्यात थोडावेळ पाय ठेवल्यास मुरगळलेल्या पायाच्या त्रासापासून आराम मिळतो. सफरचंद व्हिनेगर त्रास निवारण्यात मदत करतं सफरचंद व्हिनेगरचे काही थेंब कोमट पाण्यात घालून त्यामध्ये पाय थोडा वेळ बुडवून ठेवा. ही प्रक्रिया नियमितपणे केल्याने वेदना कमी होतात. हळदीचं दूध पिणं आरामदायक एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन केल्याने टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी-बायोटिक गुणधर्म असतात, म्हणून याचा वापर दुखापत किंवा वेदनांच्या समस्या दूर करते. आल्याचा काढादेखील प्रभावी आल्याचा काढा तयार करण्यासाठी चार वाटी पाणी उकळा, त्यात 2 चमचे आले पूड आणि एक चमचा मध घालून हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा पिण्यास ठेवावे, त्यामुळे देखील त्रासातून आराम मिळेल. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -  टाचा दुखणे न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या