JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शुद्ध गूळ कसा ओळखायचा? खरेदी करताना 'या' गोष्टींकडे द्या लक्ष

शुद्ध गूळ कसा ओळखायचा? खरेदी करताना 'या' गोष्टींकडे द्या लक्ष

गुळाचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः हिवाळ्यात सर्दी व खोकल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोज गूळ खाणं शरीरासाठी खूप चांगलं मानलं जातं.

जाहिरात

गूळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : गुळाचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः हिवाळ्यात सर्दी व खोकल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोज गूळ खाणं शरीरासाठी खूप चांगलं मानलं जातं. मात्र, काही लोकांना शुद्ध आणि बनावट गुळातील फरक कळत नाही, त्यामुळे लोक बाजारातून बनावट गूळ खरेदी करतात. अशातच जर तुम्ही हिवाळ्यात भरपूर गूळ खात असाल तर काही खास टिप्स वापरून तुम्ही शुद्ध आणि बनावट गूळ ओळखू शकता. गुळाचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यात जेवणानंतर अनेक जण गूळ खातात. गूळ पचनासाठी चांगला असतो. काही लोक नकळत बाजारातून बनावट गूळ आणतात. या नकली गुळाचं सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अशा परिस्थितीत गूळ खरेदी करण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला शुद्ध आणि बनावट गुळातील फरक सहज समजू शकतो. चला तर मग जाणून घेऊया शुद्ध गूळ ओळखण्याच्या काही स्मार्ट टिप्स. हेही वाचा -  सकाळी कढीपत्त्याचा चहा ट्राय करा, स्ट्रेस घालवण्यासोबत या 6 गोष्टींवर दिसेल परिणाम चव तपासा गुळाची चव घेऊन तुम्ही खरा आणि बनावट गूळ ओळखू शकता. यासाठी गूळ विकत घेण्यापूर्वी त्याचा एक तुकडा घेऊन त्याची चव घेऊन पाहा. गुळाची चव जरा कडू किंवा खारट असेल तर समजून घ्या की तो गूळ बनावट आहे. दुसरीकडे, गूळ पूर्णपणे शुद्ध आणि खरा असतो जेव्हा त्याची चव गोड लागते. बाजारात डार्क ब्राऊन आणि लाइट ब्राऊन रंगात गुळाचे अनेक प्रकार उपलब्ध असतात, पण त्यापैकी डार्क ब्राऊन रंगाचा गूळ पूर्णपणे शुद्ध असतो. त्याचबरोबर गुळाचा रंग फिका करण्यासाठी अनेक प्रकारची केमिकल्स वापरली जातात. यासोबत लाइट ब्राऊन गुळाचं वजन वाढवण्यासाठी गूळ पॉलिश करून विविध प्रकारची भेसळ केली जाते. त्यामुळे गूळ खरेदी करताना डार्क ब्राऊन रंगाचा गूळ घेणं कधीही चांगलं. वॉटर टेस्ट करून पाहा शुद्ध आणि बनावट गूळ ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याची मदत घेऊ शकता. बनावट गूळ गोड बनवण्यासाठी त्यात शुगर क्रिस्टल टाकलेले असतात. अशा स्थितीत नकली गूळ पाण्यात टाकल्यास तो भांड्याच्या तळाशी जातो. तर, शुद्ध गूळ मात्र वजन कमी असल्याने पाण्यात तरंगतो आणि लवकर विरघळतो. अशा रितीने तुम्ही शुद्ध आणि बनावट गूळ ओळखू शकता. बनावट गूळ खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकतं, त्यामुळे तुम्ही शुद्ध गुळाचं सेवन करताय, याची खात्री करून घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या