इंग्लंड, 09 मे: झोप (Sleep) ही माणसासहित सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. जर आपण पुरेशी झोप घेतली तर अनेक आजारांपासून आपली सहज सुटका होते. झोपेमुळे आपल्या शरीराला आराम (Rest) मिळतो परिणामी, कार्यक्षमता (Functionality) वाढते. जर पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला डिप्रेशनसारख्या (Depression) मानसिक आजारांना (Mental Illness) सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे झोपेला आपल्या दैनंदिन आयुष्यात फार महत्त्व आहे; पण झोपेबाबतदेखील अनेक समज-गैरसमज पसरलेले आहेत. एखाद्या व्यक्तीनं रात्री किती तास (Sleeping Hours) झोपावं? हा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की, व्यक्तीनं दररोज आठ तास झोप घ्यावी, तर काहींच्या मते नऊ तास झोपलं पाहिजे. काही लोक असेही आहेत ज्यांना माणसासाठी सात तासांची झोप परिपूर्ण वाटते. अशा स्थितीमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना नेमकं किती तास झोपलं पाहिजे? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. इंग्लंडमधील (England) केंब्रिज युनिव्हर्सिटी (Cambridge University) आणि चीनमधील (China) फुदान युनिव्हर्सिटीतील (Fudan University) शास्त्रज्ञांनी माणसानं किती तास झोपावं याबाबत रिसर्च (Research) केला आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांसाठी झोपेचा कालावधी (Sleeping Duration) वेगवेगळा असला पाहिजे, असं रिसर्चमधून समोर आलं आहे. विशेषत: ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या(British Scientists) संशोधनातून झोपेबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या रिसर्चमध्ये 38 ते 73 वर्षे या वयोगटातील सुमारे पाच लाख व्यक्तींनी सहभाग घेतला होता. सायन्सटेकच्या रिपोर्टनुसार, रिसर्चमध्ये सहभागी लोकांना त्यांच्या झोपेबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या मदतीनं त्यांची मानसिक क्षमता (Mental Capacity) आणि आरोग्याविषयी माहिती गोळा करण्यात आली. त्यांना अशा काही अॅक्टिव्हिटी दिल्या गेल्या ज्यातून त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी, कामाचा वेग आणि व्हिज्युअल अटेंशन (Visual Attention) तपासलं गेलं. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
कोळी अंगावर चढलेला दिसणं शुभ मानलं जातं की अशुभ? जाणून घ्या त्याविषयी रंजक गोष्टी
वेगवेगळ्या वयोगटांसाठी झोपेचे तासही वेगळे असले पाहिजेत, असं संशोधकांचं म्हणणं आहे. मध्यम व त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी सात तासांची झोप योग्य आहे. तर, प्रौढ व्यक्तीसाठी आठ तासांची झोप आवश्यक आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीतील रिसर्चर प्रोफेसर बार्बरा साहकियान (Barbara Sahakian) म्हणाल्या, ‘रात्री पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं न झाल्यास आपल्या मेंदूला (Brain) हानी पोहोचवणाऱ्या केमिकल्सचं शरीरातील प्रमाण वाढतं. मेंदूवर त्याचा थेट परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ पुरेशी झोप न मिळाल्यास डिम्नेशिया (Dementia) होऊ शकतो.’
रिसर्चमध्ये असं निदर्शनास आलं आहे की, कमी किंवा जास्त झोप घेणं या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. झोपेचा थेट परिणाम मानवी मेंदूवर होतो. त्यामुळे पुरेशी झोप न मिळाल्यानं व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर (Memory) आणि विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. रिसर्चर्सनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्च केलेल्या व्यक्तींपैकी ज्यांनी सातत्यानं सात तासांची झोप घेतली त्यांचा अॅक्टिव्हिटी दरम्यानचा परफॉर्मन्स चांगला होता. जर एखादी व्यक्ती फक्त चार ते पाच तास झोपत असेल किंवा 10 ते 11 तास झोपत असेल तर त्या व्यक्तीवर झोपेचा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच फार कमी किंवा फार जास्त झोप घेणं दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही.