JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Tips and Tricks: गरमा-गरम खाताना अनेकदा जीभ भाजते; हे घरगुती उपाय लगेच देतील आराम

Tips and Tricks: गरमा-गरम खाताना अनेकदा जीभ भाजते; हे घरगुती उपाय लगेच देतील आराम

जीभ भाजली गेली की मग चांगलीच अडचण होते. असा प्रकार सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडलेला असतो. गरमा-गरम खात असताना चुकून जीभ भाजलीच तर काय करावं याविषयी जाणून (Tips and Tricks) घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मार्च : अनेक पदार्थ असे आहेत, जे गरम-गरम खायला जास्त मजा येते. प्रत्येकाचे असे आवडते पदार्थ नेमके कोणते याची वेगवेगळी लिस्ट तयार होईल. आवडीचे पदार्थ गरम खाण्याच्या नादात कधी चुकून आपली जीभ (Tongue) भाजते. आवडता खाद्य पदार्थ समोर आला की, आपण गरम गरम खाण्यासाठी उचलतो आणि तोंडात घालतो, असं केल्यानं आपली जीभ भाजते. जीभ भाजली गेली की मग चांगलीच अडचण होते. असा प्रकार सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडलेला असतो. गरमा-गरम खात असताना चुकून जीभ भाजलीच तर काय करावं याविषयी जाणून (Tips and Tricks) घेऊया. जर तुमची जीभ कधी गरम काहीतरी खाल्ल्याने किंवा प्यायल्याने भाजली असेल तर सर्वप्रथम तुम्ही ती बेकिंग सोड्याने धुवावी. बेकिंग सोडा जिभेची जळजळ कमी करण्यास मदत करेल. तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन असला तरी जीभ भाजल्यानंतर तुम्हाला काही दिवस मसालेदार आणि चमचमीत पदार्थ खाणं टाळावं लागेल. जीभ पूर्णपणे बरी होईपर्यंत फक्त हलके आणि कमी तिकट पदार्थ खा. हे वाचा -  डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी जीभ भाजल्यानंतर तुम्हाला फार अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही बर्फ वापरू शकता, परंतु जीभेवर लावण्यापूर्वी बर्फ नीट धुवा, अन्यथा तो तुमच्या जिभेवर चिकटू शकतो. त्वरित बरं वाटण्यासाठी आपण जीभेवर मध वापरू शकता. मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे तुमचा अस्वस्थपणा कमी होण्यास मदत होईल. जिभेच्या भाजलेल्या भागावर तुम्ही थेट मध लावू शकता. भाजलेल्या जिभेवर दही वापरणे हा उत्तम घरगुती उपाय आहे. दह्यामध्ये थंड करण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे जर तुमची जीभ भाजली असेल तर लगेचच एक चमचा दही थोडावेळ जीभेवर ठेवून खा. यामुळे लगेच आराम मिळेल. हे वाचा -  आजार कित्येक उपाय फक्त एक; कडुलिंबाच्या पानांचा ज्युस यामुळे ठरतो गुणकारी मिंट हे नैसर्गिक मेन्थॉल आहे,भाजलेल्या जिभेवर तुम्ही पुदिना पेस्ट वापरू शकता. भाजलेल्या जागेवर पेपरमिंट ठेवल्याने ती जागा बधीर होते आणि भगभग कमी होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या