JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी वाढली हे कसं ओळखाल? जाणून घ्या अधिक माहिती

शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी वाढली हे कसं ओळखाल? जाणून घ्या अधिक माहिती

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 09 नोव्हेंबर : सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांचं आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लठ्ठपणाच्या समस्येमुळे डायबेटिस, किडनीचे आजार, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक अशा अनेक आजारांचा धोकाही वाढत आहे. या आजारांसाठी शरीरातील कोलेस्टेरॉलचं उच्च प्रमाण सर्वांत जास्त कारणीभूत ठरतं. कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तातील मेणासारखा पदार्थ असतो. कोलेस्टेरॉलचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, एक चांगलं कोलेस्टेरॉल आणि दुसरं वाईट कोलेस्टेरॉल. अर्थात चांगलं कोलेस्टेरॉल आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं. तर, वाईट कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप घातक मानलं जातं. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. परिणामी, हृदयापर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह खूप कमी होतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. विशेष म्हणजे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची सुरुवात झाली आहे, याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. यामुळेच कोलेस्टेरॉलला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप जास्त होतं, तेव्हा ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं. रक्तवाहिन्यांमध्ये जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल जमा झाल्यानंतर मात्र, आपलं शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देऊ लागतं. हे सिग्नल आपण ओळखले पाहिजेत. पायांमध्ये गोळे येणं, हे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचा सर्वांत मोठा इशारा आहे. पायांत गोळे येणं हा सर्वांत मोठा इशारा कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पेरिफेरल आर्टरी डिसीज होण्याची शक्यता असते. सतत लेग क्रॅम्प्स किंवा पायांना गोळे येणं, हे या रोगाचे पहिलं लक्षण आहे. पेरिफेरल आर्टरी डिसीजमध्ये, पायांच्या स्नायूंमध्ये अचानक पीळ पडतो व त्यामुळे खूप वेदना सहन कराव्या लागतात. विशेषत: जेव्हा तुमचं शरीर रेस्ट मोडमध्ये असतं आणि तुम्ही अचानक काही काम करण्यासाठी उठता तेव्हा ही समस्या उद्भवते. झोपेतून अचानक उठल्यानंतरही ही समस्या येते. सामान्यतः रक्तप्रवाहातील अडथळ्यांमुळे ही समस्या उद्भवते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं, हेच या समस्येचं मूळ आहे. पायांना येणारे गोळे हे पेरिफेरल आर्टरी डिसीजचं लक्षण आहे, हे कसं ओळखावं? पाय दुखणं आणि पायांत गोळे येणं ही समस्या अनेक कारणांमुळे जाणवू शकते. पण, काही काम करत असताना अचानक तुमच्या पायांना गोळे येत असतील किंवा बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर उठताना पेटके येण्याच्या समस्येला सामोरे जावं लागत असेल तर हे पेरिफेरल आर्टरी डिसीजचं लक्षण असू शकतं. पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे इंटरमिटंट क्लॉडिकेशनची समस्यादेखील भेडसावते. ज्यामुळे पायांना मुंग्या येणं, पाय सुन्न होणं, पाय कमजोर होणं किंवा पाय जड पडणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. पायात गोळे येण्याची समस्या, पायांच्या मागच्या बाजूला, मांडी आणि नितंबांच्याजवळ उद्भवते. ही समस्या वेळीच थांबवली नाही, तर धोकादायक बनू शकते. पेरिफेरल आर्टरी डिसीजची लक्षणं पायांना गोळे येण्याबरोबरच, पाय आणि पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ होणं, जेव्हा तुम्ही रात्री सरळ झोपता तेव्हा पायांमध्ये वेदना होणं, ही पेरिफेरल आर्टरी डिसीजची लक्षणं आहेत. या शिवाय, पायांची त्वचा थंड पडणं, वारंवार इन्फेक्शन होणं, पाय आणि टाचांमध्ये जखमा तयार होणं. झालेल्या जखमा लवकर बऱ्या न होणं, या समस्यादेखील आर्टरी डिसीजची लक्षणं असू शकतात. हाय कोलेस्टेरॉल आणि पेरिफेरल आर्टरी डिसीज प्रारंभिक लक्षणं शोधणं कठीण आहे. त्यामुळे आपण वेळोवेळी रक्त तपासणी करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हाय कोलेस्टेरॉलची समस्या असल्याची जाणीव झाली असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

आहाराच्या माध्यमातून कोलेस्टेरॉल पातळीवर ठेवा नियंत्रण शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी यकृत, अवयवयुक्त मांस, अंड्यातील पिवळं बलक, फुल फॅट दुग्धजन्य पदार्थांचं सेवन टाळा. या शिवाय तुमच्या आहारात धान्य, मसूर, बीन्स यासारख्या पदार्थांचा समावेश करा. आहारात हिरव्या भाज्या, सफरचंद, केळी, संत्री, नाशपाती या फळांचा समावेश केल्यास फायदा होईल. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही मासे खाऊ शकता. कारण माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. याशिवाय अल्कोहोल आणि मीठाचं जास्त सेवन टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या