नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla death) हार्ट अटॅकने (Heart Attack) निधन झाल्यानंतर आता हा आजार तरुणाईवर (Youngster) सातत्याने आघात करत आहे, याची चिंता सर्वांना लागली आहे. हार्ट अटॅकमुळे दररोज होणारे मृत्यूंचे आकडे अस्वस्थ करणारे आहेत. मागील काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकने अनेक नामवंत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मागच्या दशकापासून या आजारामुळे मरणाऱ्यांची संख्या 50 टक्यांनी वाढली असल्याची माहिती एका सर्वेक्षणानंतर समोर आली आहे. जगभरातील काही आंतरराष्ट्रीय संस्था आणि आरोग्य संस्थांचे अहवाल काय सांगतात, हे आपण जाणून घेऊया. कोरोनामधून घरी बरे झालेल्या रुग्णांना किडनीचा धोका अधिक: रिसर्च जगभरातील आरोग्यविषयक जाणकारांचं म्हणणं आहे कि या आजाराच्या वाढत्या प्रमाणाला लोकांची बदलती जिवनशैली, अयोग्य किंवा अवेळी असलेला आहार आणि मानसिक तणाव ही कारणे आहेत. त्यामुळं हार्ट अटॅकने मृत्युंचं प्रमाण वाढत आहे. यांसंदर्भात आता काही देशांतील सरकारे आणि काही आंतरराष्ट्रीय एनजीओ काम करत आहेत. त्यामुळे आता हार्ट अटॅक या आजाराविषयी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतात मागील काही काळात या आजारामुळे अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार: 1. हार्ट अटॅकने मरणाऱ्यांची संख्या 50 टक्यांनी वाढली 2. 2014 मध्ये मृत्यूंचा आकडा हा 18309 होता तर तो वाढून 2019 मध्ये 28005 झालाय. 3. दर पाच वर्षांनी हार्ट अटॅकने मृत्यू वाढतच गेले. 4. हार्ट अटॅकचा आजार आता प्रत्येक वयोगटात वाढत आहे. Sidharth Shukla death: काही व्यायामही वाढवतात हृदय विकाराचा धोका टीव्ही अभिनेता आणि Bigg Boss फेम सेलिब्रिटी सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla death at 40) वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे (Hearth Attack reasons) निधन झालं. या धक्कादायक एक्झिटमुळे बॉलिवूडसह सामान्य जनांनाही धक्का बसला आहे. सेलेब्रिटी त्यांच्या फिटनेससाठी (celebrity fitness rourine) जागरुक असतात. काटेकोर आहार, नियमित व्यायाम हा त्यांच्या रूटीनचा भाग असतो. शिवाय सिद्धार्थ तणावाखाली नव्हता, हेही त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. असं असताना एक ठणठणीत माणूस अचानक कसा काय मृत्युमुखी पडतो? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. तणाव, अनारोग्यकारक लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे हृदयविकाराचा आजार लहान वयातही जाणवू शकतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, अति व्यायामामुळेही अचानक कार्डियाक अरेस्ट (एससीए-SCA) किंवा अचानक कार्डियाक डेथ (एससीडी- SCD) होण्याचा धोका वाढू शकतो.