JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी

इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी

Weight Loss Drink: ग्रीन टीची चव बऱ्याच जणांना आवडत नाही. पण, तिचे आरोग्याला बरेच फायदे असतात.

जाहिरात

वजन नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. यामुळे मेटाबॉलिजम सुधारेल आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय कमी कॅलरी असलेल्या कुकीजही घेऊ शकता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जुलै : चहाच्या कपाबरोबर सकाळ होत असेल आणि वजन कमी (Weight Loss) करण्याची चिंता सतावत असेल तर, ही सवय बदलून ग्रीन टी (Green Tea) प्यायला सुरूवात करा. सकाळचा पहिला चहा म्हणून ग्रीन टी पिणं आवश्यक आहे. आरोग्याला फायदेशीर (Health Benefits) असलेला हा चहा त्याच्या चवीमुळे प्रत्येकालाच आवडतो असं नाही. त्यामुळे ग्रीन टीची टेस्ट बदलून (Change Test) घ्यायला सुरूवात करा. ग्रीन टीमध्ये एन्टीऑक्सिडन्ट (Antioxidant) गुणधर्म भरपूर आहेत. नियमित घेतल्यास अगदी आपण कॅन्सरसारख्या (Cancer) जीवघेण्या आजारांपासूनही स्वत: ला वाचवू शकतो. यात अनेक बायोएक्टिव्ह गुणं आहेत. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. टाइप-2 डायबेटीज (Type 2 Diabetes) असलेल्या रुग्णांसाठीही ग्रीन टी खुप फायदेशीर मानली जाते. नियमित घेतल्याने स्किन एजिंगचा परिणाम होत नाही. याशिवाय वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरतं. ( लो ब्लड शुगर लेव्हलनेही होते त्रास; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष ) करा या पद्धतीने ग्रीन टी जास्तवेळ ग्रीन टी बॅग गरम पाण्यात ठेवली तर त्याची चव खराब होऊ शकते. त्यामुळे चवही कडूही होऊ शकते. ग्रीन टी करताना मंद आचेवर पाणी उकळावा. गॅस बंद करा. ( पाच संत्री आणि एक सामोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी सामोसाच वाईट का? ) यानंतर,कपवर एक गाळणी ठेवा आणि गाळणीमध्ये अर्धा चमचा ग्रीन टी घाला. यानंतर,कपमधून वरून पाणी घाला. गाळणीत ग्रीन टी गरम पाण्यात बुडले 2 मिनिटांनंतर चहा तयार आहे. अशी वाढवा टेस्ट ग्रीन टीची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू आणि मध घाला. ( ग्रीन टीमुळे खरंच वजन कमी होतं का? ) यामुळे चवीबरोबर हेल्थ बेनेफिट्सही वाढतात. याशिवाय हवं असल्यास आलं किंवा थोडी काळी मिरी, वेलची देखील घालू शकता. याने चवीबरोबर फायदेशीर गुणही वाढतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या