मुंबई, 10 मार्च : आपल्या आहाराचं नियोजन करताना सगळी पोषक तत्व जसं की जीवनसत्व, खनिजं यांचं संतुलन साधणं गरजेचं आहे. अनेकजण वजन वाढू नये म्हणून सावध असतात. यामुळं ते आहारातून स्निग्ध पदार्थ एकदमच वगळून टाकतात. (Health Tips in Marathi) मात्र तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, की फॅट अर्थात स्निग्ध पदार्थ हे चांगले आणि वाईट (G00d and Bad Fats) अशा दोन प्रकारचे असतात. काही पदार्थ चांगल्या स्निग्ध पदार्थांचे स्रोत असतात. मात्र हेल्दी आणि अनहेल्दी फॅट्स ओळखता आले पाहिजेत. जाणून घ्या काही हेल्दी फॅट्स देणारे पदार्थ. यांना आहारात आवर्जून समाविष्ट करा. यातून ऊर्जा मिळेल सोबतच आवश्यक पोषणतत्वही शोषली जातील. (Good and Bad Fats in Marathi) पूर्ण अंडं तुम्ही हेल्दी हाय फॅट्स आहारात अंडी समाविष्ट करू शकता. विशेषतः नाश्त्यात. अंडी प्रथिनं, ड आणि ब जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत आहे. अंड्याचा पांढरा भाग अधिक पोषक असतो मात्र बलकामध्येही पोषकतत्त्व असतात. कोलेस्ट्रॉल न वाढता अंडं खाल्ल्या जाऊ शकतं. (which are good fats for human body) हेही वाचा रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलपत्र उपयुक्त, जाणून घ्या फायदे ऑलिव्ह्ज सगळ्या प्रकारचे ऑलिव्ह्ज हे चवदार आणि हेल्दी फॅट्सचा स्रोत असतात. हिरवे आणि काळे असे दोन्ही ऑलिव्ह्ज तुम्ही खाऊ शकता. यातून आरोग्य चांगलं राखता येतं. याशिवाय पास्ता, पिझ्झा आणि सॅलडमध्येही ऑलिव्ह्ज टाकावी लागतात. यात खूप फायबर्सही असतात. तुम्ही जेवणही ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवू शकता. (which fats are good to eat, good fat food to eat) डार्क चॉकलेट तुमच्याकडे डार्क चॉकलेटचा एक तुकडा असेल तर तो खाल्ल्यानं यातून केवळ साखरेची पातळी नियंत्रणात येईल असं नाही तर हेल्दी फॅट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमही यातून मिळेल. तणावही कमी होतो. मूड चांगला होतो. यात खूप अँटिऑक्सिडंट्सही असतात. हेही वाचा पाहिले न मी तुला : खणाच्या साडीत खुलली ‘मनू’; नव्या PHOTO शूटवर चाहते फिदा दही दही हा डेअरी प्रॉडक्ट कमी कार्ब्ज आणि चांगल्या फॅट्ससाठी सगळ्यात चांगला स्रोत आहे. नैसर्गिक दही चांगल्या फॅट्ससह संपूर्ण प्रोबायोटिक अन्न आहे. हे खाल्ल्यानं पोट चांगलं राहतं. जेवणासह नियमित दही खाल्ल्यास वजन अजिबात वाढणार नाही. ऍव्होकॅडो एव्होकॅडो एक चांगला, मलईदार आणि चविष्ट पदार्थ आहे. अनेकांना हे फळ आवडतं. याला नैसर्गिक लोणीही म्हटलं जातं. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतं. यात खूप जीवनसत्व आणि खनिजंही असतात. (Disclaimer - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)