तज्ज्ञांच्यामते नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारे पदार्थ जास्त पौष्टिक आणि आयुष्य वाढवणारे असतात.
नवी दिल्ली, 23 जून : कोरोनामुळे **(Corona)**सगळ्यांनाच रोग प्रतिकारशक्तीच (Immunity) महत्व कळलेलं आहे. व्हायरल इनफेक्शनमध्ये (Viral Infection) वाचायचं असेल तर, आपली इम्युनिटी चांगली असावी लागेत. योग्य आहार घेतला तर, कोणताही आजार लवकर होत नाहीत पण, आपण हेल्दी फूडपेक्षा (Healthy Food) जिभेचे चोचले पुरवणारा आहारच खात असतो. त्यामुळे पोट भरल्याचं समाधान मिळतं. पण, त्याने शरीराला काही फायदा मिळत नाही. चवीच खाण्याच्या नादात आरोग्याला हानी पोहचवणारे पदार्थच आपण खातो. पाहुयात कोरोनाकाळात कोणते पदार्थ टाळायला हवेत. साखर साखर प्रेमींनी आपली सवय बदलायला हवी. कारण, रोजच्या आहारात साखरेचं प्रमाण कमी केलं तर, बरेच आजार दूर राहता. चविष्ठ वाटणारे गोड पदार्थ खात असाल तर आधी बंद करा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर-अल्फा, सी-रिऍक्टिव प्रोटीन आणि इंटरलेयुकिन 6 सारखे घातक प्रोटीन वाढतात. साखरेत भरपूर कॅलरी असतात, ज्यामुळे इम्युनोलॉजिकल फंक्शन खराब होऊ शकतं. ( No Panty Day म्हणजे काय? महिला का साजरा करतायत हा दिवस? ) मीठ जागतिक आरोग्य संघटनेने दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ न खाण्याचा सल्ला दिला आहे. पण, बऱ्याच जणांना बेकरी प्रोडक्ट, चिप्स,खारवलेले पदार्थ खायला आवडतात. यात भरपूर मीठ असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरावर बॅक्टेरियाचा हल्ला झाला तर लढण्याची ताकद कमी होते. त्यामुळे मीठ प्रमाणात खावं. जास्त प्रमाणात मीठ खाल्याने ग्लुकोकोर्टिकॉइडच्या पातळीतही वाढ होऊ शकते. ( पालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी ) तळलेले पदार्थ बाजारात मिळणारे तळलेले पदार्थ आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. फ्रेंच फ्राईज,समोसे,पॅक्ड चिप्स हे खायला सगळ्यांना आवडतं. काही लोक घरीसुद्धा तळलेले पदार्थ बनवता. पण, संशोधनानुसार तळलेले पदार्थ खाल्ल्याने हार्ट एटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तळलेले पदार्थात प्रोटीन ग्लाइकेशन असतात. पदार्थ तळताना हा घटक वाढतो. AGE मुळे हृदयाचं नुकसान होतं. कॅफीन जास्त प्रमाणात कॉफी किंवा चहा घेतल्याने झोपेवर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेने रोग प्रतिकारशक्ती कमी होते. दररोज चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर, या सवयीवर थोडा ताबा ठेवावा. संध्याकाळी जास्त उशिरा चहा किंवा कॉफी पिऊ नये. दिवसात केवळ 2 कप चहा प्यावा. ( डायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल ) मद्यपान जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. मेयो क्लिनिकच्या मते,जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेच शिवाय बरेच आजार होतात. यकृत आणि मूत्रपिंडाचं नुकसान होतं. त्यामुळे या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर, हे पदार्थ ठाळा.