JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमच्या मनातही आहेत का पाळीबद्दलचे ‘हे’ गैरसमज ? जाणून घ्या तथ्य

तुमच्या मनातही आहेत का पाळीबद्दलचे ‘हे’ गैरसमज ? जाणून घ्या तथ्य

महिलांच्या पाळीसंदर्भात अनेक गैरसमज(Misunderstanding)आहेत. वर्षानुवर्षे हे समज महिला आणि मुलींच्या मनात घर करून राहिलेत.

जाहिरात

या गोळ्या आपल्या मासिक पाळीच्या सायकलवर काम करत असतात. या गोळ्या ओव्युलेशन थांबवतात किंवा पुढे नेऊ शकता. त्यामुळेच प्रेग्नन्सी रोखू शकतात. प्रेग्नन्ट महिलांनी या गोळ्यांचा वापर करू नये.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : दर महिन्याला महिलांना मासिक पाळी येते. तरीही, मासिक पाळीवर बोलणं हा समाजात गुन्हाच असल्यासारखं मानणाऱ्या महिला पाळीबद्दल जात बोलत नाहीत. त्यामुळे पाळीबद्दल जास्त माहिती हवी असली तरी ती मिळत नाही. त्यामुळे मुली त्यांच्या आजी आणि आईने शिकवलेल्या गोष्टीचं लक्षात ठेवतात. कारण त्यावर चर्चाच होत नसल्याने योग्य माहिती मिळवण्यासाठी माध्यमच उपलब्ध नसतं. त्यामुळे पाळीबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवला जातो. पाहुयात पाळीबद्दल कोणते गैरसमज आजही महिलांच्या मनात असतात आणि त्यात किती सत्यता आहे. पाळीत होणारा रक्तस्त्राव म्हणजे खराब रक्त पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव म्हणजे कोणतंही खराब रक्त नसतं किंवा यामधून कोणत्याही प्रकारचे टॉक्सिन्स बाहेर पेकले जात नाहीत. पण, या रक्तामध्ये युटेरिन टिश्यू, म्युकस लायनिंग आणि बॅक्टेरिया असतात. तरी याला खराब रक्त बोलता येणार नाही. पाळी चारच दिवसांची असावी प्रत्येक महिलेचं शरीर वेगळ असतं. त्यामुळे तिचं पिरेड सायकही वेगळचं असणार म्हणजे, तिच्या शरीराच्या जडणघडणी प्रमाणे पाळीचे दिवस ठरतात. तर, वयाप्रमाणेही पाळीचा काळ ठरतो. कोणाला 4 दिवस तर, कोणाला 6 दिवसही रक्तस्त्राव होतो. ( खरंच प्रेमात आंधळा झाला! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या नादात शेकडोंचा जीव पणाला ) आंबट पदार्थ टाळावेत काही महिला पाळीच्या काळात आंबट पदार्थ टाळतात. मात्र, याला कोणत्याही प्रकारे वैज्ञानिक आधार नाही. पण, पाळीच्या दिवसात महिला किंवी मुलींनी हेल्दी आहार घेण्यावर भर द्यावा. केस धुऊ नये हा एक मोठा गैरसमज आहे. पाळीचा आणि केस धुण्याचा कोणताही संबंध नाही. पण, सर्दीचा त्रास असेल तर, जास्त वेळा केस धूऊ नयेत. पाळीच्या काळात अंग दुखत असतं. पाय कंबर किंवा पोटही दुखतं अशावेळी दिवसातून 2 वेळा आंघोळ केल्याने फायदा होतो. पाळी 30 दिवसांनी येते पाळीचं चक्र 28 ते 30 दिवसांचं असू शकतं. काही महिलांना पाळी 35 दिवसांनीही येते. त्यामुळे यात घाबरण्यासारखं काहीच नसतं. ( छोट्याछोट्या गोष्टींमुळे नातं होईल खराब; सुखी संसारासाठी या चुका टाळा ) पाळी दरम्यान व्यायाम करणं योग्य नाही हा एक मोठा गैरसमज आहे. हलका,योग्य व्यायाम अवश्य करावा. नियमित व्यायाम करणं हे शरीरासाठी आवश्यक आहे. योग्य पद्धतीने हलका व्यायाम पाळी दरम्यान केल्याने पाळी दरम्यान होणारे शारीरिक त्रास कमी होतात. पाळीमुळे शरीरातील रक्त खूप कमी होते सर्वसाधारणपणे पाळी दरम्यान फक्त ८० मिलि इतकाच रक्तस्त्राव होतो. ८० मिलिपेक्षा जास्त म्हणजे साधारण ५ दिवसांपेक्षा जास्त रक्तस्त्राव झाला तरच तो अति रक्तस्त्राव असतो. पण, या प्रकारचा रक्तस्त्राव होत असेल तर, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यामुळे पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो हा गैरसमज आहे. ( कुणाची जातेय स्मृती, कुणी होतंय बहिरं; सेक्स लाइफ सुधारताना भयंकर दुष्परिणाम ) पाळीत मनस्थिती बिघडते पाळी सुरू होण्याआधीच्या काळात शरीरात हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे सारखे मूड स्विंग होणं, रडू येणं, पोट दुखणं, पिंपल्स येणं, बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणं असे त्रास होऊ शकतात. पाळीच्या काळात सेक्स करू नये पाळीदरम्यान सेक्स करणं काही महिलांना आवडत नाही. पाळी असतांना सेक्स केल्याने आपल्याला काही त्रासात आराम मिळतो. तज्ज्ञांच्यामते पाळीदरम्यान सेक्स केल्याने वेदना कमी होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या