ऑफिसमध्ये काम करुन दुखतेय मान?
मुंबई, 12 डिसेंबर : आजकाल संगणक किंवा लॅपटॉपवर सतत अनेक तास बसून काम करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होमची संस्कृतीही खूप वाढली आहे. अशा स्थितीत सतत अनेक तास खुर्चीवर बसून, मान वाकवून मोबाईल पाहणे किंवा पुस्तक वाचणे यामुळेही मान किंवा पाठदुखीचा त्रास वाढतो. यावर वेळीच उपचार केले नाही तर अनेकवेळा ही समस्या गंभीर स्वरुप धारण करते. त्यामुळे मान, खांदे आणि पाठदुखीचा त्रासही सुरू होतो. तुम्हालाही मानदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी आम्ही असे काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मानेच्या दुखण्यापासून सहज सुटका मिळवू शकता. मानदुखीपासून मुक्त होण्याचे सोपा उपाय वेब एमडीच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला मानेच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवू लागल्या तर सावध व्हा आणि सर्वप्रथम तुमचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा आणि विश्रांती घ्या. तुमच्या शरीराला आराम देताना ध्यान केल्याने तुमच्या मानदुखीसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या शरीराचे पॉश्चर बरोबर ठेवा आणि वाकड्या तिकड्या पद्धतीने झोपू नका. चुकीच्या स्थितीत बसल्यानेही मानदुखीचा त्रास होतो. उंच उशी वापरण्याऐवजी पातळ आरामदायी उशी वापरा. सकाळ संध्याकाळ मानेला मसाज केल्याने वेदना कमी होतात. यासाठी हलके कोमट तेल घेऊन मानेला हलक्या हातांनी मसाज करा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही व्यायामही करता येतात. वाचा - सर्दीपासून डायबिटिजपर्यंत रामबाण उपाय आहे पेरूची पानं, अशापद्धतीने करा वापर जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर सतत तासनतास बसू नका, तर उठून चालण्याची सवय लावा. मानेवर अनावश्यक ताण देऊ नका. शरीराची स्थिती दुरुस्त करताना तुमची खुर्ची, डेस्क, सिस्टीम इ. अॅडजस्ट करा. हेल्थलाइननुसार, जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर ही सवय लवकर सोडा आणि पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा. जर तुमची गादी खूप मऊ असेल किंवा तिची गुणवत्ता चांगली नसेल, तर ती बदला आणि तुमच्या मानेला आणि पाठीला आधार देणारी एक मजबूत गादी निवडा.
या अशाच काही सोप्या टिप्स आहेत, ज्या दैनंदिन दिनचर्यामध्ये सहजपणे पाळल्या जाऊ शकतात. यामुळे तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो, पण त्यानंतरही तुमचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.