JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips: झोपेत पायदुखीच्या दुखण्यानं झालात हैराण?, या 5 घरगुती उपायांचा होईल फायदा

Health Tips: झोपेत पायदुखीच्या दुखण्यानं झालात हैराण?, या 5 घरगुती उपायांचा होईल फायदा

रात्री झोपेत पायांना होणाऱ्या वेदनांमुळे (Leg Pain) झोपही लागत नसेल.तर,आधी हे घरगुती उपाय (Home Remedies) करुन पहा.

जाहिरात

चालण्याच्या प्रक्रियेत गुढघ्यांचं घर्षण होतं. रोजच्या चालण्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो. अशावेळेस उलटं चालण्यामुळे गुडघ्याच्या आतील हाडांना सपोर्ट करणाऱ्या स्नायूंवरचा तणाव कमी होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 11 जुलै: नवी दिल्ली, 10 जुलै: दिवसभर आपण कितीतरी कामं करतो. चालतो, बराच वेळ उभं राहतो, प्रवास करतो या सगळ्यात आपल्या पायांवर जास्त वजन येत असतं. आजच्या धावपाळीच्या जीवनात (Busy Life) लोकांना स्वत: कडे लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. दिवसभर दगदग करून जेव्हा आपण अंथरूणात झोपायला जातो, तेव्हा आपले पाय दुखू (Legs pain) लागतात. त्यामुळे झोपही येत नाही. खरंतर, शरीरात काही पोषक तत्त्व नसल्यामुळे (Lack of Nutrients)पाय दुखण्याचा त्रास होतो. या वेदना कमी करायच्या असतील तर, काही घरगुती उपाय (Home Remedies) करून पायांच्या वेदनापासून मुक्ती (Relief from Leg Pain) होऊ शकते. सैंधव मीठ पायांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठाचं पाणी खूप प्रभावी ठरू शकतं. सैंधव मीठ मिसळून ते पाणी पाय धुवण्यासाठी वापरल्यानं पायांच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात आणि पायांवरील सूज देखील कमी होण्यास मदत होते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एक कप सैंधव मीठ घालून ते एकत्र करा. किमान 20 मिनिटं या पाण्यात पाय बुडवा. तुमच्या पायांना नक्की आराम पडेल. ( OMG! 32 नाही तर 82; 17 वर्षीय तरुणाच्या जबड्यातील दात पाहून डॉक्टरही शॉक ) स्ट्रेचिंग एक्सरसा पायदुखीपासून आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाईजचा देखील फायदा होऊ शकतो. स्ट्रेचिंग एक्सरसाईज करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. पायांची मॉलिश आपल्या पायातील वेदना कमी करण्यासाठी आपण आपल्या पायांची मॉलिश करू शकता. यामुळे वेदना कमी होऊन रक्ताभिसरण सुधारेल. यासाठी आरामदायक खुर्चीवर बसा आणि आपल्या पायांना मॉलिश करा. फूट रोलर्सचाही वापर करु शकता. अनेक चांगल्या प्रतिचे तेल बाजारात मिळतात. त्यांच्यानंही मॉलिश केल्यास आराम मिळतो. ( कोरोनानंतर Bell’s Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका ) बर्फानं शेक देणं पायांवर बर्फ लावल्याने वेदना आणि सूज कमी होते. यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत बर्फ भरून किंवा बर्फ झालेल्या पाण्याची बाटली पायावर फिरवा. पायात सूज येत असेल तर ती कमी करण्यासाठी दिवसातून बर्‍याच वेळा 5 ते 15 मिनिटं बर्फाने त्या भागावर बर्फाचा शेक द्या. ( अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती ) फिश ऑईल पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज, वेदना कमी होण्यास मदत होते. नुकत्याच झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जे रुग्ण नियमितपणे फिश ऑईल घेतात त्यांना वेदनांचा त्रास्त कमी होतो. यामुळे काही रुग्णांच्या सांध्यांच्या वेदना आणि सूज कमी झाली. फिश ऑईल पायदुखी बरी करण्यात मदत करते तसंच या ऑईलमुळे पाय अधिक लवचिकही बनतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या