JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / त्वचेवर ‘ही’ 3 लक्षणं दिसताच तपासा Blood Sugar; हालचाल करणंही होईल कठीण

त्वचेवर ‘ही’ 3 लक्षणं दिसताच तपासा Blood Sugar; हालचाल करणंही होईल कठीण

ब्लड शुगर (Blood Sugar) वाढली तर, शरीराबरोबर त्वचेवरही (Skin) त्याची लक्षणं दिसतात. त्याकडे वेळीच लक्ष द्यावं.

जाहिरात

त्वचेवर रॅशेस येत असतील तर, मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून लावा. मोहरीत अ‍ॅन्टी-बॅक्टेरियाल आणि अ‍ॅन्टी-फंगल गुणधर्म असतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 31 जुलै : आजच्या काळात मधुमेह एक गंभीर समस्या (Problem) बनली आहे. मधुमेह कधीच पूर्ण बरा करणं शक्य नाही पण, नियंत्रणात (Control) ठेवला जाऊ शकतो. डायबेटिज (Diabetes) हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम (Body Effect) होतं. या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळेच त्याला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण याची लक्षणं लवकर लक्षात येत नाहीत. लोक मधुमेहापासून बचाण्यासाठी आणि रक्तातील साखरेची (Blood Sugar Level) पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. लाईफस्‍टाईल (Lifestyle) बदलून आहारात बदल करून आणि मेडिकेशने डायबेटीस (Diabetes) कंट्रोल **(**Control) करता येतो. डायबेटीजच्या रुग्णाना औषधांबरोबर (Medicine) बरीच पथ्यही पाळावी लागतात. या रूग्णांना त्यांच्या आहाराची (Diet) खूप काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांमध्ये रक्तातली साखर जास्त वाढल्यावर त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. कधीकधी शरीराबरोबर त्वचेमध्ये (Skin) हाणारे बदल देखील आपल्याला मधुमेहाचे संकेत देऊ शकता. ( राशीभविष्य: आज वृषभ आणि तुला राशीसाठी नवीन वस्तूंची खरेदी करण्याचा दिवस ) त्वचेवर खाज आणि कोरडेपणा आरोग्य तज्ज्ञांच्यामते रक्तातील साखरेची पातळीत वाढली की त्वचा कोरडी होते. तसंच, त्वचेवर खाज येणं हे देखील मधुमेहाचं लक्षण आहे. रक्तातील साखरेमुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह कमी होतो. यामुळे, पुरेश्या प्रमाणात रक्त आणि पोषण घटक रक्तवाहिन्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे पांढऱ्या पेशी इनफेक्शनशी लढण्यात कमजोर ठरतात. ( Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे ) जाड त्वचा डायबेटिजच्या रुग्णांच्या बोटं आणि अंगठ्यांच्या मागच्या भागात वॅक्स सारखा पदार्थ जमायला लागतो. त्यामुळे बोट आखडतात आणि हालचालही करता येत नाही. यालाच डिजिटल स्क्लेरॉसिस म्हणतात हा एक त्वचा विकार आहे. कदीकधी  पूर्णहाताची त्वाचा जाड होते. हाताबरोबर पाठीचा वरचा भाग, खांदे आणि मानेवर हा त्रास होतो. ( भरपूर कॅलरीज देणाऱ्या केळ्यांनीही होतं नुकसान; होईल पोटदुखी,वाढेल वजन ) त्वचेवर पुरळ येणं सुरवातीला त्वचेवर पुरळ येतं. हळूहळू त्यावर सुज येऊन कडक व्हायला लागून मोठे डाग तयार होतात. पिवळे, लाल तपकिरी रंगाचे डाग येतात. यावर खाज येणं आणि वेदना येतात. त्याला नेक्रोबिऑसिस लिपोडिका असं म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या