JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डोळे-पाय जास्त फडफडणे कँन्सरचं लक्षण असू शकतं; असं होत असेल तर काळजी घ्या

डोळे-पाय जास्त फडफडणे कँन्सरचं लक्षण असू शकतं; असं होत असेल तर काळजी घ्या

तज्ज्ञांच्या मते, एखादा भाग फडफडणे देखील विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे एक चिंताजनक लक्षण असू शकते. ब्रेन ट्यूमरमुळे मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये उत्तेजना निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे मुंग्या येणे किंवा फडफडण्यासारखा प्रकार होऊ शकतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जून : कर्करोग हा प्राणघातक रोग रक्त, हाडे, फुफ्फुस किंवा यकृत यासह मानवी शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. कर्करोगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात, ज्या शरीरात कुठेही पसरू शकतात. या आजाराबाबत घबराट पसरवणारी गोष्ट म्हणजे अनेक वेळा त्याची लक्षणे ट्यूमरच्या मूळ जागेशी संबंधित नसतात. कधीकधी घातक कर्करोगाच्या पेशी अनियंत्रितपणे पसरतात आणि ऊतींवर आणि नसा केंद्रित असलेल्या भागांवर आक्रमण करतात. यामुळे रुग्णाला आकुंचने, चमकणे किंवा जागा फडफडणे. शरीरामध्ये फडफडणे (Twitching) हे आपोआप होत असले तरी कॅफिनच्या सेवनामुळेही होऊ शकते. तज्ज्ञ काय म्हणतात - तज्ज्ञांच्या मते, एखादा भाग फडफडणे देखील विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे एक चिंताजनक लक्षण असू शकते. मोनिका वासरमन, एमडी, oliolusso.com यांच्या मते, ब्रेन ट्यूमरमुळे मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये उत्तेजना निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे मुंग्या येणे किंवा फडफडण्यासारखा प्रकार होऊ शकतो. डोळे-पाय फडफडण्याचा धोका - जेव्हा मेंदूच्या स्टेम, ओसीपीटल लोब किंवा टेम्पोरल लोबमध्ये (occipital lobe and temporal lobe) ट्यूमर विकसित होतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीची दृष्टी अंधुक किंवा डबल दिसण्याचा त्रास होऊ शकतो किंवा डोळे फडफडण्याचा अनुभव येऊ शकतो. कॅन्सरमुळे डोळे आणि पाय फडफडण्याचा धोका जास्त असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेनिन्जिओमा मेनिन्जिओमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो मज्जासंस्थेभोवती असतो. येथे, जेव्हा ट्यूमर मेंदू किंवा रीढच्या हाडावर विरूद्ध दाब देतो तेव्हा लक्षणे उद्भवतात, ज्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागाच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो. हे वाचा -  Heart Attack वेळी फक्त छातीतच दुखत नाही; अनेकांमध्ये अशी लक्षणं पण दिसून येतात मेनिन्जिओमाच्या लक्षणांमध्ये motor seizures, एपिलेप्टिक सीझरचा एक प्रकार यांचा समावेश होतो. यामध्ये स्नायू अचानक हलू लागतात. त्यांना हादरे जाणवतात. म्हणजे एखादी व्यक्ती स्नायूंच्या अचानक आणि अनैच्छिक हालचाली पाहू शकते. जेव्हा ट्यूमर मेंदूच्या चार पैकी तीन लोबमध्ये पसरतो (टेम्पोरल लोब, पॅरिएटल लोब किंवा फ्रंटल लोब), त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलण्यात समस्या देखील येऊ शकतात. हे वाचा -  स्वयंपाकात दालचिनीचा वापर करणाऱ्या अनेकांना त्याचे हे आरोग्य फायदे माहीत नाहीत फ्रंटल लोब फ्रंटल लोब (frontal lobe) हा मानवी मेंदूचा सर्वात मोठा लोब आहे. हा एक भाग आहे जो निर्णय घेणे, एकाग्रता, समस्या सोडवणे आणि विचार करण्याच्या कार्यांची गती यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा मणक्यावर परिणाम होतो, तेव्हा सामान्यत: स्नायूंमध्ये समस्या उद्भवतात, ज्या मुख्यतः घोट्याच्या आणि पायाच्या भागात घट्टपणा जाणवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या