नवी दिल्ली, 11 एप्रिल : अधूनमधून पोट फुगणं, गॅस, पोटाचा जडपणा या गोष्टी कॉमन आहेत. कारण अनेकदा झोप न लागणे, जास्त खाणे किंवा काहीतरी जड खाल्ल्याने असे होते. मात्र, सतत किंवा काहीही खाल्ल्यानंतर तसं होत असेल तर ते हलक्यात घेऊ नका. कारण ते पोटासोबतच शरीराच्या इतर विकारांमुळेही होऊ शकते. याला ब्लोटिंग (Bloating) म्हणतात. काही लोक अनेकदा पोट फुगण्याच्या समस्येने त्रस्त असतात. पोट फुगणे म्हणजे पोट आणि आतड्यांमध्ये गॅस तयार होणे. ब्लोटिंगमुळे पोट फुगलेले राहते. वास्तविक, असं कोणत्याही आजारामुळं होत नाही, सामान्यतः याचे सर्वात मोठे कारण फूड अॅलर्जी मानले जाते. पण, पोट फुगण्याचे हे एकमेव कारण नाही, नॉन डाइट्री ट्रिगरदेखील पोट फुगण्याचे कारण असू शकते. याशिवाय, हे कार्बोनेटेड शीतपेये, जास्त खाणं, मासिक पाळी येणे, बद्धकोष्ठता इत्यादीमुळे देखील होऊ शकते. पोट फुगते (stomach bloating) त्यावेळी ते सामान्य आकारापेक्षा मोठं होतं. ही अत्यंत अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. ओटीपोटात जडपणा आणि पोटाला ताण बसतो. पोट आतून खूप जड होऊ शकतं आणि गॅसची समस्या देखील असू शकते. याशिवाय खालील तीन कारणांमुळेही पोट फुगण्याची समस्या उद्भवते. स्ट्रेस आणि ब्लोटिंगचा संबंध आहे आपला मेंदू आणि शरीर दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. शरीराला मेंदूची भाषा चांगली समजते. तणाव आणि चिंता आपल्या श्वासोच्छवासाच्या पद्धतींमध्ये आणि पचनसंस्थेच्या समन्वयामध्ये व्यत्यय आणतात. चिंतेमुळे, आपण आपल्या आत जास्त हवा घेतो, जी पोटात साठते आणि पोट फुगण्यास त्रास वाढतो. बसण्याची पद्धत चुकीची जेवताना वाकून न बसता सरळ बसावे. जेवताना वाकून बसल्याने पोटात जास्त हवा जाते, ज्यामुळे पोट फुगण्याचा त्रास वाढतो. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी जेवताना सरळ बसा, जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळा आणि शक्य असल्यास 10 मिनिटे हलके चालावे. योग्य आहार अन्नधान्य आणि कडधान्यांसह भाज्या आणि फळे यासारखे निरोगी आणि विरघळणारे फायबर खा, जे आतड्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. जास्त खाणे टाळा, कारण पोटात ते पचणे कठीण होते. जेवण एकदम जास्त खाण्यापेक्षा कमी-कमी जास्त वेळा खा. आपल्या आहारात दह्यासारख्या नैसर्गिक प्रोबायोटिक्सचा समावेश करा. हे वाचा - हसतं-खेळतं, आनंदी राहतं कुटुंब; वास्तुनुसार घरात या मूर्ती ठेवायला विसरू नका पोट फुगणे, गॅस होण्याची कारणे - - खराब खाण्याच्या सवयी - अन्न नीट न चावणे - तेलकट आणि मसालेदार अन्न जास्त खाणे - अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्सचा अति प्रमाणात वापर - दीर्घकाळ तणाव किंवा नैराश्यात राहणे - जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी राहणे - शरीरात ऑक्सिजनची कमतरता - दीर्घकाळ औषधे वापरणे - शरीरात गंभीर आजार होण्याचे लक्षण घरगुती उपाय करून पहा जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या टाळण्यासाठी, खाल्ल्यानंतर लगेच 1/4 चमचे ओवा कोमट पाण्यासोबत घ्या. तुमचे पोटही हलके होईल आणि गॅसही तयार होणार नाही. - जेवल्यानंतर लगेच हिरव्या पुदिन्याची 4 ते 5 पाने घ्या आणि चिमूटभर काळे मीठ चावून खा. यानंतर, आवश्यक असल्यास, फक्त 1 ते 2 घोट गरम पाणी प्या. तुम्हाला फायदा होईल. हे वाचा - चहा प्यायल्यानंतर कधीही लगेच या गोष्टी खाऊ नयेत; वेगळेच त्रास सुरू होतात - हिरवी वेलची खाणं देखील फायदेशीर आहे. तुम्ही हिरवी वेलची तोंडात ठेऊन ती टॉफीप्रमाणे चोखून आणि चावून खा. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)