चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे उपाय - सक्रीय रहा - तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितके तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल चांगले राहील. यासाठी तुम्ही दररोज किमान अर्धा तास व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, योगा, सायकलिंग इत्यादी करू शकता.
नवी दिल्ली, 17 मार्च : वाढत्या वजनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्नांनी जेव्हा आपण व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा बऱ्याच लोकांकडून अशी चूक होते. आपण पाहिले असेल की, लोक उद्यानात किंवा रस्त्यावर बूट न घालता चप्पल घालून चालत असतात. चालण्याचा (Walking) व्यायाम वजन कमी करण्यासह अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे. पण, चालताना काळजी न घेतल्यानं आरोग्याला फायदा न होता, नुकसान होऊ शकते. विशेषत: महिला त्यांचे काम संपवून चप्पल घालून जवळच्या उद्यानात किंवा रिकाम्या रस्त्यावर फिरायला जातात. त्यामुळे त्यांना पाय आणि गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. CNA ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही शूजऐवजी चप्पल (Slippers) किंवा चुकीची पादत्राणे घालून चालत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ (Side Effects Of Wearing Slippers For Walking) शकतात. वॉकिंग शूज घालून चालण्याचे फायदे दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फिटनेससाठी ज्याप्रमाणे आहार आणि दिनचर्या पाळणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे फिटनेससाठी योग्य पादत्राणे देखील खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही चप्पल घालून चालत असाल तर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. असं केल्यानं महिनाभर चालल्यानंतरही वजन कमी होणार नाही आणि फिटनेसही मिळणार नाही. चालण्यासाठी योग्य पादत्राणे निवडणे महत्त्वाचे का आहे? जेव्हा तुम्ही वॉकिंग शूज घालून चालता तेव्हा तुम्हाला बराच वेळ थकवा जाणवत नाही. जर तुम्ही चप्पल घालून चालत असाल तर तुमच्या चालण्याच्या पद्धतीत फरक पडतो आणि त्याचा हाडांवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही चुकीचे पादत्राणे घालून चालत असाल तर पायांच्या त्वचेला नीट हवा मिळू शकत नाही, ज्यामुळे पायांशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात. साधी चप्पल घालून चालताना पायाच्या कमानीला फारसा आधार मिळत नाही, त्यामुळे पाय दुखण्याची समस्या सुरू होते. जर तुम्ही जास्त वेळ चप्पल घालून चालत असाल तर नंतर गुडघे आणि घोट्यांभोवती त्रास होऊ लागतो. हे वाचा - Weight Loss Drinks: बेली फॅटला फास्ट कमी करतात ही ड्रिंक्स; तुम्हीही वापरून पाहा त्यातच जर कोणी उंच टाचेच्या चप्पल घालून चालत असेल तर पायाच्या तळव्यामध्ये वेदना होतात आणि आपण लगेच थकून जातो. जेव्हा तुम्ही चप्पल घालून चालता, तेव्हा पायाला ग्रीप मिळण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, तर शूजमध्ये असे होत नाही. योग्य आकाराचे आरामदायी शूज चालताना वापरल्यास तुमच्या शरीराचा समतोल तर राहतोच, पण तुम्हाला थकवाही जाणवणार नाही. चुकीची पादत्राणे परिधान केल्यानं पायांच्या संरचनेत बदल, खराब चाल, बुरशीजन्य संसर्ग, पाठदुखी, गुडघेदुखी, पिंडऱ्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. हे वाचा - सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हाडांसाठीही असं ठरतं घातक; वेळीच बदला सवय तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे पाय मोठे आहेत आणि त्यांनी घट्ट शूज वापरू नयेत. यामुळे अंगठ्याच्या नखांना दुखापत होऊ शकते आणि बनियन्स, म्हणजे अंगठ्याच्या सांध्यातील हाडांना त्रास होण्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, जर तुमचे पंजे रुंद असल्यास, समोरून रुंद तोंडाचे शूज वापरा. ज्यांचे पाय नॉर्मल आहेत, त्यांना जास्त अडचण येणार नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)