मुंबई, 02 मे : आंबा हे असं फळ आहे, ज्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आरोग्यासाठी आंब्याचे अनेक फायदे आहेतच, पण फक्त आंबाच नाही तर त्याची कोयदेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. होय, जर तुम्ही आंबा खावून कोय फेकत असाल तर अशी चूक इथून पुढे करू नका. कारण, आंब्याप्रमाणेच त्याच्या कोयमध्येही असे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यात कोलेस्ट्रॉल, डायरिया आणि हृदयाशी संबंधित आजारांशी लढण्याची क्षमता असते. जाणून घेऊया, आंब्याची कोय आरोग्यासाठी कशी प्रभावी आहे आणि त्याचा (Mango kernels Benefits) वापर कसा करावा. लूज मोशनमध्ये - लूज मोशन सारख्या समस्या टाळण्यासाठी आंब्याच्या कोयीची पावडर घेण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आंब्याची कोय नीट वाळवून तुकडे करून बारीक पावडर बनवा. ही पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून आणि त्यात थोडा मध घालून सेवन करू शकता. तुम्ही एका वेळी 1 ग्रॅमपेक्षा जास्त कोय पावडर वापरत नाही याची खात्री करा. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील - आंब्याची कोय रक्ताभिसरणाला चालना देते आणि त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. आंब्याच्या कोयची पावडर खाल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते. हृदयविकाराचा धोका - आंब्याची कोय हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील उपयोगी आहे. त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याची पावडर खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही किमान 1 ग्रॅम आंब्याच्या कोयीची पूड खाऊ शकता. हे वाचा - उन्हाळ्यात COOL राहण्यासाठी मलायका अरोरानं सांगितली 3 योगासनं; तुम्हीही करून बघा चांगले पचन- ज्यांना अॅसिडिटीच्या समस्येने अनेकदा त्रास होतो त्यांच्यासाठी आंब्याची कोयीची पूड हा चांगला उपाय आहे. आंब्याच्या बियांमध्ये फिनॉल आणि फिनोलिक संयुगे असतात, जे पचनास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास कोयची पावडर फायदेशीर आहे. हे वाचा - भूक मंदावण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात होतोच; हे 5 घरगुती उपाय भूक वाढवतील स्कर्वीच्या उपचारात प्रभावी व्हिटॅमिन सीने समृद्ध, आंब्याच्या कोयची पावडर स्कर्वीच्या रुग्णांसाठी जादुई उपायाप्रमाणे काम करते. तुम्हाला फक्त एक भाग कोयच्या पावडरमध्ये दोन भाग गूळ आणि चुना मिसळून खावी लागेल. व्हिटॅमिन सीचा तुमचा दैनंदिन डोस पूर्ण करण्यासाठी तुम्ही साधारणपणे याचे सेवन करू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)