नवी दिल्ली, 06 मार्च : आपण पाहिले असेल की, अनेकदा लोकांसोबत असं घडतं की कोणत्याही कारणाशिवाय त्यांचा मूड खराब होतो किंवा त्यांना वाईट वाटू (Low feel) लागतं. आनंदी राहणं नंतर क्षणार्धात दुःखी होणं किंवा मूडमध्ये अचानक बदल होणं, एखाद्या व्यक्तीच्या भावनिक स्थितीत अचानक बदल होणं, कोणत्याही कारणाशिवाय मूड खराब होतो आणि तितक्याच लवकर बराही होतो. या सगळ्या प्रकाराला मूड स्विंग म्हणतात. मूड स्विंग म्हणजे अल्पावधीत मूडमध्ये अचानक बदल होणं. हे कोणाच्या बाबतीतही होऊ शकतं आणि याची अनेक कारणे असू (Mood swings in women) शकतात. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, मासिक पाळी, गर्भधारणा (Pregnancy) किंवा रजोनिवृत्ती (Menopause) दरम्यान होणार्या हार्मोनल चढउतारांमुळे देखील महिलांमध्ये मूड स्विंग होऊ शकतो. मासिक पाळीपूर्व सिंड्रोम 90% पेक्षा जास्त स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) लक्षणे दिसतात, ज्यामध्ये मूड बदलण्याचा देखील समावेश आहे. मासिक पाळीपूर्वी अस्वस्थता मासिक पाळीच्या आधी होणारी डिसफोरिक डिसऑर्डर (PMDD) ही मासिक पाळी सुरू होण्याच्या 1-2 आठवड्यांपूर्वी चिडचिड, चिंता किंवा नैराश्य (Depression) निर्माण करणारी स्थिती आहे. गर्भधारणा मूड स्विंग हे गर्भधारणेचे सामान्य लक्षण आहे. हे गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात असं होऊ शकतं. रजोनिवृत्ती मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉज दरम्यान महिलांचा मूड बदलतो. या सर्वांशिवाय, तारुण्य, मानसिक आरोग्य आणि न्यूरोलॉजिकल स्थिती आणि औषधांमुळे देखील मूड बदलू शकतो. हे वाचा - रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी का बरं वाढते? मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी मूड स्विंग्स कसे नियंत्रित ठेवावे मूड स्विंग्स टाळता येत नाहीत. अशा परिस्थितीत, सर्व प्रथम स्वत: ला समजावून सांगा की यात तुमची चूक नाही. मूड स्विंग्स नियंत्रित करण्यासाठी तुम्ही जर्नलिंग, योग-ध्यान इत्यादींचा अवलंब करून माइंडफुलनेसचा सराव करू शकता. - कॅफिन आणि अल्कोहोल दोन्ही पीएमएस आणि रजोनिवृत्तीची लक्षणे वाढवू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून आणि धूम्रपानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा - मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, चिंता, नैराश्य आणि थकवा येऊ शकतो. या प्रकरणात, पुरेशी झोप घेण्याची खात्री करा. विश्रांतीचा मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो. तुम्ही श्वासोच्छवासाचे व्यायाम, योगासने किंवा मसाज करून स्वतःला आराम करू शकता. मनोरंजनाने मूड सुधारला जाऊ शकतो. गाणे, नृत्य, पोहणे इत्यादी छंदामुळे मूड स्विंग्स नियंत्रित करता येतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)