JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / त्वचेवर असे त्रास अचानक वाढले तर हा होळीच्या केमिकलयुक्त रंगांचा परिणाम असू शकतो

त्वचेवर असे त्रास अचानक वाढले तर हा होळीच्या केमिकलयुक्त रंगांचा परिणाम असू शकतो

Artificial Colours Side Effects on Skin : होळीचे गडद रंग लवकर साफ होत नाहीत. गुलालापेक्षा लिक्विड रंग आरोग्यासाठी हानिकारक असतात. लिक्विड रंग कंबर, मांड्या, बगल, डोक्याच्या त्वचेवर अनेक दिवस राहतात, ज्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 मार्च : होळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगांमुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. कृत्रिम रंगांमध्ये (Artificial colours) अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे त्वचा आणि केसांचे सर्वाधिक नुकसान होते. काळे, हिरवे, निळे, लाल, गुलाबी रंग विशेषतः जास्त हानिकारक असतात, कारण या गडद रंगांमध्ये हानिकारक रसायने जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, जळजळ होणे इत्यादी समस्या होतात. हे त्रास जास्त काळ त्वचेवर राहिल्यास त्वचेच्या आतील थरापर्यंत पोहोचल्याने त्वचेच्या कर्करोगाचा (Skin Cancer) धोका वाढू (Side Effects of Holi Colours on Skin) शकतो. कृत्रिम रंगांमुळे त्वचेचे नुकसान इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, होळीच्या वेळी बाजारात अनेक प्रकारचे कृत्रिम रंग उपलब्ध असतात, ज्याची लोक बिनदिक्कतपणे खरेदी करतात. काही हलके रंग वगळता, हिरवा, जांभळा, काळा, लाल, निळा इत्यादी गडद रंगांमध्ये कॉपर सल्फेट, लीड ऑक्साईड, अॅल्युमिनियम ब्रोमाइड, प्रशियन ब्लू, मर्क्युरी सल्फाइट, कोबाल्ट नायट्रेट यासारखे हानिकारक रासायनिक घटक असतात. विशेषत: लिक्विड रंग त्वचेवर जास्त काळ टिकून राहिल्यास त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचेवर जास्त कोरडेपणा येण्याची शक्यता असते. होळीचे हे गडद रंग लवकर साफ होत नाहीत. गुलालापेक्षा लिक्विड रंग आरोग्यासाठी हानिकारक असतात. लिक्विड रंग कंबर, मांड्या, बगल, डोक्याच्या त्वचेवर अनेक दिवस राहतात, ज्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. होळीच्या रंगांमुळे त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा, त्वचा सोलणे, एक्जिमा होऊ शकतो. होळीचे रंग घालवण्यासाठी त्वचेवर जास्त घासल्यास त्वचेवर ओरखडे येऊ शकतात. यासोबतच बॅक्टेरियल इन्फेक्शन, मुरुमे, आधीची एक्झामाची समस्याही वाढू शकते. कोरड्या त्वचेचा त्रास असलेल्या, त्वचेचा कोणताही विकार असल्यास होळीच्या दिवशी त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी. काही लोकांमध्ये केमिकल कलरिंगमुळे त्वचेची समस्या, केस गळणे, जसे की अलोपेसिया, डोळ्यांमध्ये जळजळ, डोळ्यात पाणी येणं, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, कॉर्नियामध्ये समस्या उद्भवू शकतात. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये होळीच्या रंगांमुळे त्वचारोगदेखील होऊ शकतात. काही उपाय नैसर्गिक सेंद्रिय किंवा घरगुती हर्बल रंग वापरा. रासायनिक रंग अजिबात वापरू नका. हे वाचा -  अंघोळ करताना होणाऱ्या या चुका टाळा; तुमच्या Natural beautyवर होईल असा परिणाम चांगल्या दर्जाचे आणि ब्रँडेड रंग खरेदी करा. होळी खेळण्यापूर्वी त्वचेवर, कानाच्या मागे, बोटांच्या टोकांना, नखांना आणि केसांना मोहरीचे तेल खोबरेल तेस, ऑलिव्ह ऑईल किंवा व्हिटॅमिन ई तेल लावा. दोन किंवा तीन वेळा नखांवर नेलपॉलिश लावा. डोळ्यात रंग आला तर चोळण्याऐवजी पाण्याचा शिडकावा करून स्वच्छ करा. भगभग, जळजळ तीन-चार तासांनीही कमी होत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. रंग स्वच्छ करण्यासाठी सौम्य किंवा हर्बल साबण वापरा. काही घरगुती उपाय करून पहा. अंगावर काही जखमा, व्रण असल्यास पट्टी किंवा लेप लावा जेणेकरून जखमांमधून रंग त्वचेच्या आत जाणार नाही. काळजी न घेतल्यास इंटरनल कॅन्सर, ब्लड स्ट्रीम पोहोचल्यामुळे अंधत्व येण्याचा धोका वाढू शकतो. हे वाचा -  या 5 डाळींमधून मिळतं मुबलक प्रोटीन; पिळदार बॉडी बनवण्यासाठी असा करा उपयोग डॉक्टरकडे कधी जायचे त्वचा खूप लाल झाली असल्यास, खाज सुटत असेल, जळजळ होणे, फोड येणे, चेहऱ्यावर सूज येणे, त्वचेवर व्रण होणे, प्रकाशसंवेदनशीलता, अचानक केस गळणे, पूर्वीपासून असलेल्या त्वचेच्या आजारांची तीव्रता वाढणे, श्वासोच्छवासाचा त्रास, बोटांचे टोक निळे होणे यासारख्या समस्या दिसल्यास नंतर विलंब न करता, डॉक्टरांचा किंवा त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या