JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात डोळे का चुरचुरतात? जाणून घ्या त्यामागची कारणं

पावसाळ्यात डोळे का चुरचुरतात? जाणून घ्या त्यामागची कारणं

पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण अनेकजण अॅलर्जी आणि साथीच्या आजारांना बळी पडतो

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : पावसाळा सुरू झाल्यानंतर निश्चितच उन्हापासून सुटका झाल्याचा आनंद आपल्याला मिळतो. पण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण अनेकजण अॅलर्जी आणि साथीच्या आजारांना बळी पडतो. या दिवसात अनेकांचे डोळे चुरचुरतात. असं का होतं? हे आज आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या सगळ्यांच्याच त्वचेवर एक संरक्षक थर असतो. ज्यामुळे त्वचेचं रक्षण होतं. तसाच संरक्षक थर आपल्या डोळ्यांवरसुद्धा असतो. एखादवेळेस अचान आपल्या डोळ्यासमोर एखादा किडा येतो, किंवा अचानक आलेल्या वाऱ्याबरोबर धूळ येते तेव्हा आपल्या पापण्या आपोआप मिटतात. बाहेरची गोष्ट डोळ्यात जाऊ नये म्हणून ही संरचना प्रत्येकाच्या डोळ्यात असते. मात्र, ती शंभर टक्के काम करतेच असं होत नाही. पावसाळ्यात होणाऱ्या ‘या’ 5 आजारांची अशी घ्या काळजी अनेकदा नकळत आपल्या डोळ्यात काही सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यात जातात. या सूक्ष्मजीवांची जर आपल्या शरीराला अॅलर्जी असेल तर त्याचा प्रतिरोध करण्यासाठी लगेच आपलं शरीर प्रत्युत्तर देतं. अशावेळेस शरीरावर आक्रमण करणाऱ्या सूक्ष्मजीवांना प्रतिरोध करण्यासाठी सगळ्यात पहिले संरक्षक पेशींची फौज उभी राहते. चष्मा सोडवायचा आहे? मग घरच्याघरी करा ‘हे’ सोपे उपाय शरीरातील प्रतिकारक यंत्रणा त्या गोष्टींना शत्रू समजते. त्याची प्रतिक्रिया म्हणून हिस्टमाईनसारखे अनेक रासायनिक संदेश मेंदूकडे पाठवले जातात. ज्यामुळे खाजविणाऱ्या विशिष्ठ चेतापेशी सक्रिय होतात. त्याचा परिणाम म्हणून डोळे चुरचुरतात आणि खाजवतात. अशावेळेस ज्याकाही शारीरिक क्रिया तुमच्या हातून घडतात त्या सगळ्या डोळ्यांच्या संरक्षणासाठीच असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या