JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Hair Care Tips : रिव्हर्स हेअर वॉशिंग म्हणजे काय? केसांसाठी फायद्याचे असते की नाही?

Hair Care Tips : रिव्हर्स हेअर वॉशिंग म्हणजे काय? केसांसाठी फायद्याचे असते की नाही?

हेअर वॉश आपण सर्वच जण करतो. मात्र हेअर वॉश करण्याची एक उलट पद्धतदेखील आहे. हे तुम्हाला माहित आहे का? आजकाल रिव्हर्स हेअर वॉशिंग (Reverse Hair Washing) हा एक नवीन ट्रेंड सुरु आहे. बरेच लोक त्यांचे केस बाऊन्सी आणि चमकदार बनवण्यासाठी रिव्हर्स हेअर वॉशला प्राधान्य देतात. जाणून घ्या रिव्हर्स हेअर वॉश म्हणजे काय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै : केस धुणे हा केसांची काळजी घेण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. केस स्वच्छ करण्यापासून केसांचे आरोग्य राखण्यापर्यंत. या सर्वांसाठी केस धुणे खूप महत्वाचे असते. केस कसे धुवायचे हे तर सर्वांचं माहित आहे. परंतु हल्ली रिव्हर्स हेअर वॉशिंग (Reverse Hair Washing) हा एक प्रकार सुरु झाला आहे. याचे आपल्या केसांना अनेक फायदे (Reverse Hair Washing Benefits) होतात. मात्र त्यासाठी रिव्हर्स हेअर वॉशिंग म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घेऊया. रिव्हर्स हेअर वॉशिंग म्हणजे काय आणि पद्धत केसांची विशेष काळजी घेण्यासाठी हल्ली रिव्हर्स हेअर वॉशिंग केली जाते. ही पद्धत (Steps Of Reverse Hair Washing) वापरायला काही अवघड नाही. हेअर वॉश करताना बहुतेक लोक केस ओले केल्यानंतर आधी शॅम्पूने केस धुतात आणि नंतर केसांना कंडिशनर लावतात. तर या उलट रिव्हर्स हेअर वॉशिंगमध्ये केले जाते. यामध्ये केस ओले केल्यानंतर आधी कंडिशनर लावले जाते आणि 5 मिनिटांनंतर केस शॅम्पूने धुतले जातात.

केस पांढरे होतायत? काळजी करू नका! घरातील हा पदार्थ पांढऱ्या केसांवर आहे उत्तम उपाय

संबंधित बातम्या

रिव्हर्स हेअर वॉशिंगचे फायदे रिव्हर्स हेअर वॉश केल्याने केसांचा व्हॉल्युम (Hair Volume) कायम राहतो आणि केस बाऊन्सी (Bouncy Hair) होतात. तसेच केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी रिव्हर्स हेअर वॉश हा सर्वोत्तम मार्ग आहे. रिव्हर्स हेअर वॉशिंग केल्याने केस मऊ आणि चमकदार बनतात. मासिक पाळी वेळेवर येत नाही? दुर्लक्ष करू नका, गर्भधारणेदरम्यान येऊ शकतात अडथळे रिव्हर्स हेअर वॉशिंगचे दुष्परिणाम केमिकल्सपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी कंडिशनर खूप उपयुक्त ठरते. परंतु रिव्हर्स हेअर वॉशमध्ये कंडिशनर आधी वापरला जातो आणि नंतर शॅम्पू केला जातो. यामुळे कंडिशनर विशेषत: जाड केसांवर फारसे प्रभावी ठरत नाही. तसेच दररोज रिव्हर्स वॉशिंग (Disadvantages Of Reverse Hair Washing) केल्याने केसांशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून केवळ एकदा रिव्हर्स हेअर वॉश करणे चांगले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या