JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उन्हाळ्यातही केस राहतील सॉफ्ट-शायनी; घरीच असा बनवा कोथिंबीर आणि मधाचा हेअर पॅक

उन्हाळ्यातही केस राहतील सॉफ्ट-शायनी; घरीच असा बनवा कोथिंबीर आणि मधाचा हेअर पॅक

Hair Pack For Soft Shiny And Strong Hair : कोथिंबीरीमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे केसांसाठी फायदेशीर असतात, तर मध केसांना कंडिशनिंग म्हणून काम करतो. जाणून घेऊया केसांसाठी कोथिंबीर आणि मधाचा हेअर पॅक कसा बनवायचा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 एप्रिल : उन्हाळ्यात उन्हाचा कडाका, प्रदूषण आणि घाम यामुळे केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्याने केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. इतकेच नाही तर केसांचा मऊपणा नाहीसा झाल्यामुळे ते तुटायला लागतात आणि रुक्ष होतात. उन्हाळ्यात केसांच्या चांगल्या हेल्थसाठी तुम्हाला हवे असल्यास, रासायनिक कंडिशनर किंवा हेअर पॅकच्या तुलनेत कोथिंबीर (Coriander) आणि मधाचा घरगुती हेअर पॅक (Hair Pack) वापरून तुम्ही केस मजबूत आणि सुंदर बनवू शकता. कोथिंबीर आणि मध दोन्ही केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांचा वापर केल्यानं केस मजबूत तर होतात आणि केस गळणेही कमी होते. कोथिंबीरीमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे केसांसाठी फायदेशीर असतात, तर मध केसांना कंडिशनिंग म्हणून काम करतो. जाणून घेऊया केसांसाठी कोथिंबीर आणि मधाचा हेअर पॅक कसा (Hair Pack For Soft Shiny And Strong Hair) बनवायचा. हेअरपॅक कसा बनवायचा हेअरपॅक तयार करण्यासाठी, तुम्हाला एक वाटी किंवा मूठभर ताजी कोथिंबीर, अर्धा चमचा मध आणि एक चमचे खोबरेल तेल आवश्यक आहे. तुम्हाला हवे असल्यास खोबरेल तेलाऐवजी जवसाचे तेलही घेऊ शकता. केसांच्या जाडीनुसार तुम्ही हे प्रमाणा दुप्पट करू शकता. हे वाचा -  हाडांच्या दुखण्याला संधीवात समजण्याची चूक करू नका; हा गंभीर आजार झालेला असू शकतो हेअर पॅक कसा बनवायचा सर्वप्रथम ताजी हिरवी कोथिंबीर घेऊन त्याची मूळं काढून स्वच्छ पाण्याने धुवा. आता मिक्सरमध्ये थोड्या पाण्याच्या मदतीने चांगली बारीक करा. तयार पेस्ट एका भांड्यात काढा. आता त्यात मध आणि जवसाचे किंवा खोबरेल तेल घाला. आता या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि पेस्ट बनवा. कोथिंबीर मध हेअर पॅक तयार आहे. हे वाचा -  Weight Loss : पोटॅशियमनं समृद्ध या पदार्थांचा आहारातील समावेश झटपट करेल वजन कमी असा वापरा सर्व प्रथम, कंगव्याने आपले केस पूर्णपणे कंघी करा. आता हा पॅक ब्रशच्या मदतीने तुमच्या डोक्याला चांगला लावा. सर्व पॅक डोक्याला लावल्यावर बोटांनी मुळांना हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटांच्या मसाजनंतर, डिस्पोजेबल शॉवर कॅप घाला आणि अर्ध्या तासासाठी ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूच्या मदतीने ते धुवा. चांगल्या परिणामांसाठी, हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या