JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नवरीचा हात हातात धरताच थरथर कापू लागला; लग्नाआधीच नवरदेवाची काय झाली अवस्था पाहा VIDEO

नवरीचा हात हातात धरताच थरथर कापू लागला; लग्नाआधीच नवरदेवाची काय झाली अवस्था पाहा VIDEO

नवरदेवाला नवरीला अंगठी घालणंही शक्य होत नव्हतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै: लग्न (Wedding) म्हटलं की नवरा-नवरीच्या मनात जितका आनंद, उत्साह असतो तितकीच भीतीसुद्धा असते. जेव्हा नवरा-नवरी विधीसाठी एकमेकांच्या समोर येतात, एमेकांना पाहतात तेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड वाढते, शरीर गार पडतं. त्यांच्या मनातील ही भीती त्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसून येते. सध्या अशाच एका नवरदेवाचा (Groom video) व्हिडीओ व्हायरल (Wedding video) होतो आहे, जो चक्क मांडवात थरथर कापू लागला आहे (Grooms hand trembling during engagement). थरथर कापणाऱ्या हा नवरदेव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लग्नाआधी बरेच विधी. कार्यक्रम, समारंभ असतात त्यापैकी एक म्हणजे साखरपुडा. या कपलचाही साखरपुडा समारंभ सुरू होता. साखरपुड्यात नवरा थरथर कापताना दिसला.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालायला समोरासमोर उभे आहेत. नवरा नवरीला अंगठी घालायला म्हणून तिचा हात हातात घेतो. नवरीचा हात हातात धरून तो तिला अंगठी घालण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा हात थरथरू लागतो. त्याला नवरीच्या हातात अंगठी घालणंही शक्य होत नाही. नवऱ्याला अशी अवस्था पाहून नवरीला हसू येतं. ती आपलं हसू आवरू शकत नाही. हे वाचा -  VIDEO - भरमांडवात फुटला वराच्या अश्रूचा बांध; नवरीऐवजी स्वत:च ढसाढसा रडू लागला ट्रेंडिंग वेडिंग कपल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एन्गेजन्मेंट एक्साइटमेंट असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून  त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या